• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

दमानियांच्या वक्तव्याने मोठी खळबळ : भोसले सुद्धा उद्या वाल्मीक कराड होणार !

editor desk by editor desk
March 6, 2025
in क्राईम, राजकारण, राज्य, राष्ट्रीय
0
दमानियांच्या वक्तव्याने मोठी खळबळ : भोसले सुद्धा उद्या वाल्मीक कराड होणार  !

मुंबई : वृत्तसंस्था

राज्यातील बीड येथील खून प्रकरण चांगलेच तापले असतांना आता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी आता एका नव्या मुद्या काढला असल्याने मोठी खळबळ उडाली आहे. सतीश भोसले याचे सुरेश धसांसोबतचे त्याचे अनेक फोटो, अनेक व्हिडिओ समोर आलेले आहेत. या कार्यकर्त्यावर काय कारवाई करणार याबाबत सुरेश धसांनी यावर स्टेटमेंट द्यावे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केली आहे. सतीश भोसले सुद्धा उद्या वाल्मीक कराड होणार आहे, हे आतापासून तुम्ही समजून घ्या, असेही दमानिया म्हणाल्या. तसेच देवेंद्र फडणवीस जोपर्यंत स्टेटमेंट देत नाहीत, तोपर्यंत मी अधिवेशनादरम्यान विधिमंडळासमोर उद्यापासून ठिय्या मांडणार असल्याचा इशाराही दमानिया यांनी दिला आहे.

बीडच्या बावी गावात तरुणाला बॅटने अमानुष मारहाण करतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मारहाण करणारा व्यक्ती भाजप पदाधिकारी असल्याचे बोलले जात आहे. सतिश भोसले या गुंडाने काही दिवसांपूर्वी बावी गावातल्या एका व्यक्तीला असेच मारहाण केले होते. या मारहाणीत पीडित व्यक्तीचे सगळे दात पडले. याचाही एक व्हिडिओ अंजली दमानिया यांनी शेअर केला. या सर्व घटनांच्या पार्श्वभूमीवर अंजली दमानिया यांनी आज माध्यमांशी संवाद साधत सतीश भोसलेवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

आपल्याला महाराष्ट्रात सुधारणा आणायची असेल, तर मीडियाची साथ हवी. असे येणारे सगळे दहशतीचे व्हिडिओ तुम्ही रोज लावून धरा, अशी विनंती त्यांनी माध्यमांना केली. सतीश भोसले याच्यावर आजच्या आज एफआयआर दाखल झाली पाहिजे, अशी मागणी अंजली दमानिया यांनी केले. यावेळी अंजली दमानिया यांनी सतीश भोसले याने मारहाण केलेल्या पीडितेचे तसेच भोसलेचे सुरेश धस यांचे संबंध असल्याचे फोटो आणि व्हिडिओ माध्यमांसमोर दाखवले. सतीश भोसले हा सुरेश धसांना बॉस म्हणतो, माझा विठ्ठल म्हणतो. असे असंख्य व्हिडिओ आणि फोटोज माझ्याकडे आल्याचा दावा अंजली दमानिया यांनी केला. वाल्मीक कराडचे जसे मोठ्या-मोठ्या पंचवीस गाड्या घेऊन जातानाचे व्हिडिओ होते, तसेच सेम व्हिडिओ सतीश भोसलेचे सुद्धा आहेत, असे अंजली दमानिया यांनी सांगितले. हे सगळे एका माळेचे मणी असल्याची टीकाही दमानिया यांनी केली.

जे व्हिडिओज मी पाठवलेत, तो एक-एक व्हिडिओ 30 सेकंदाचा आहे. हे सगळे व्हिडिओ दाखवा, अशी विनंती दमानिया यांनी माध्यमांना केली. मी बाई असून माझ्या हातात एवढ्या सोन्याच्या बांगड्या नाहीत, पण यांच्या हातात कोपरापर्यंत जाड सोन्याचे कडे, सगळ्या हातात सोन्याचे अंगठ्या घालून हे पुरुष काय करतात? हे कसला धाक दाखवत आहेत? असा सवाल अंजली दमानिया यांनी केला. हे सगळे जे चाललंय त्यावर राजकारण्यांचा वरदहस्त असल्याचा आरोप अंजली दमानिया यांनी केला.

 

Previous Post

उधारीच्या पैशांवरून वाद : दोन गटात तुफान हाणामारी !

Next Post

खळबळजनक : पाच जणांनी केला अल्पवयीन मुलीवर अत्याचार !

Next Post
बाप, काका व दोन भावांनी १३ वर्षीय मुलीसोबत केले घाणेरडे कृत्य !

खळबळजनक : पाच जणांनी केला अल्पवयीन मुलीवर अत्याचार !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

औष्णिक विद्युत केंद्रात कंत्राटी कामगाराचा मृत्यू !
क्राईम

औष्णिक विद्युत केंद्रात कंत्राटी कामगाराचा मृत्यू !

June 28, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

दोन दुचाकींचा भीषण अपघात : चार जण जखमी !

June 28, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

 जळगावात वेगवेगळ्या ठिकाणच्या अपघातांत तीन जण जखमी

June 28, 2025
धरणगाव तालुक्यातील शेतकऱ्याचा मका जळून खाक !
क्राईम

धरणगावात ७३ वर्षांच्या आजीवर नातवानेच केला हल्ला !

June 28, 2025
बडोदा येथे दुचाकीचा अपघात : जिल्ह्यातील दाम्पत्य ठार !
क्राईम

बडोदा येथे दुचाकीचा अपघात : जिल्ह्यातील दाम्पत्य ठार !

June 28, 2025
या राशीतील व्यक्तींना अहंकार सोडवा लागणार !
राशीभविष्य

नवीन मित्रांसह तुम्ही संगीत, मनोरंजन इत्यादींचा आनंद घ्याल.

June 28, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group