Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » पुण्यानंतर कोल्हापूर हादरले : बंदुकीचा धाक दाखवत तरुणीवर बलात्कार !
    क्राईम

    पुण्यानंतर कोल्हापूर हादरले : बंदुकीचा धाक दाखवत तरुणीवर बलात्कार !

    editor deskBy editor deskFebruary 27, 2025No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    कोल्हापूर : वृत्तसंस्था

    राज्यातील पुणे येथील स्वारगेट बस स्थानकावर उभ्या असलेल्या शिवशाही बसमध्ये एका 26 वर्षीय तरुणीवर बलात्कार केल्याची घटना ताजी असतानाच कोल्हापूर येथे देखील असाच धक्कादायक प्रकार घडला आहे. बंदुकीचा धाक दाखवत तरुणीवर बलात्कार केल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.

    सविस्तर वृत्त असे कि, कोल्हापूर येथील लक्षतीर्थ वसाहत येथे बंदुकीचा धाक दाखवत एका तरुणीवर बलात्कार करण्यात आला आहे. इतकेच नव्हे तर या नराधम आरोपीने शरीरसंबंधांचे व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत वारंवार बलात्कार केल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे. विश्वजित सचिन जाधव असे या नराधमाचे नाव असून त्याच्या विरोधात शाहपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

    पिडीत तरुणीने दिलेल्या फिर्यादीनुसार, आरोपी नराधमाने 2018 पासून वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन बलात्कार केल्याचे समजते. बंदुकीचा धाक दाखवत तसेच व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत आरोपीने बलात्कार केला. दोनवेळा इच्छेच्या विरोधात गर्भपात करायला लावला असल्याचे पीडितेने सांगितले आहे.

    पुण्याची घटना ताजी असतानाच कोल्हापूरमधल्या या घटनेमुळे पुन्हा एकदा महाराष्ट्रातील तरुणी व महिला असुरक्षित असल्याचे अधोरेखित होत आहे. बदलापूर घटनेनंतर या घटना कमी होण्याच्या ऐवजी वाढतच जात असल्याचे दिसत आहे. पुणे येथील स्वारगेट बस स्थानकात तर अक्षरशः शिवशाही बसमध्ये बलात्कार केल्याची घटना घडली आहे. स्वारगेट बसस्थानक तसे वर्दळीचे आहे, तरीही बलात्कारसारखी घटना या ठिकाणी घडली.

    पुण्यातील घटनेचा नराधम आरोपी दत्तात्रय गाडे हा अद्यापही फरार आहे. त्याच्यावर एक लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. तसेच या घटनेनंतर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी स्वारगेट बसस्थानकातील 23 सुरक्षा कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे. दरम्यान, पोलिस येथील सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून तपास करत असून आरोपीच्या भावाची चौकशीही पोलिसांनी केली आहे.

     

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    ‘जमीन घेण्यापेक्षा गोळ्या घाला’ : सरकारला शेतकऱ्यांचा संतप्त इशारा

    February 20, 2026

    बीड एसीबीची धडक कारवाई; तहसीलदारांविरोधात गुन्हा दाखल प्रक्रियेला सुरुवात

    February 20, 2026

    ‘मानवी बुद्धिमत्ता कमी पडते, AI मदत करू शकते’ – राहुल गांधींना सुनावली टिपणी

    February 20, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.