Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » भरदिवसा तरुणाला मारहाण करीत लुटले !
    क्राईम

    भरदिवसा तरुणाला मारहाण करीत लुटले !

    editor deskBy editor deskFebruary 25, 2025No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी

    शहरातील भाऊंच्या उद्यानाजवळ एका तरुणाला विनाकारण मारहाण करून त्याच्या खिशातील दीड ते दोन हजार रुपयांची रोकड जबरदस्तीने हिसकावून नेल्याची घटना रविवारी दुपारी १:३० वाजता घडली. याप्रकरणी रात्री १०:०० वाजता रामानंदनगर पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    सविस्तर वृत्त असे  कि, सुभाष रामराव घुगे (वय ३४, रा. अकोला, ह. मु, आयोध्यानगर, जळगाव) हा तरुण कामाच्या निमित्ताने जळगावात राहतो. रविवारी दुपारी सुभाष हा भाऊंच्या उद्यानाजवळ आला असता, एका अज्ञात व्यक्तीने त्याच्याशी वाद घालत शिवीगाळ करीत मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच त्याच्या खिशातील रोकड हिसकावून पसार झाला.

    घटनेनंतर सुभाष घुगे यांनी तातडीने रामानंदनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार रात्री १०:०० वाजता अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा तपास पोलिस उपनिरीक्षक प्रदीप बोरुडे करीत आहेत. दरम्यान, बाहेरगावाहून जळगावात राहण्यासाठी आलेले असताना हातची रक्कम गेल्याने तरुणावर मोठे आर्थिक संकट ओढावले आहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    अपघाताने उध्वस्त झाले प्रेमाचे स्वप्न; नववधू-वर जागीच ठार

    February 22, 2026

    जळगावच्या ७८३ ग्रामपंचायतींवर विद्यमान सरपंच प्रशासक !

    February 22, 2026

    वकिलावर प्राणघातक हल्ला प्रकरण : तिघांवर गुन्हा दाखल !

    February 22, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.