Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » पोलिसांची मध्यरात्री धडक कारवाई : २७ लाखांचे बायोडिझेल जप्त !
    क्राईम

    पोलिसांची मध्यरात्री धडक कारवाई : २७ लाखांचे बायोडिझेल जप्त !

    editor deskBy editor deskFebruary 20, 2025No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी

    शहरातील अजिंठा चौफुली येथे अवैधपणे बायोडिझेलची वाहतूक करणाऱ्या दोन टँकरवर एमआयडीसी पोलिसांनी कारवाई करत मुद्देमाल जप्त केला. मंगळवारी मध्यरात्री २ वाजता ही कारवाई करण्यात आली आहे. यासंदर्भात एमआयडीसी पोलिस ठाण्यात दोन चालकांसह त्यांच्या टँकर मालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    सविस्तर वृत्त असे कि, शहरातील अजिंठा चौफुली येथे एमआयडीसी पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक चंद्रकांत धनके यांच्यासह पोलिस पथक मंगळवारी रात्री २ वाजता गस्तीवर असताना अजिंठा चौफुली येथून संशयास्पदरीत्या जाणारे दोन टँकर त्यांनी थांबवले. त्यावेळी चालकांची चौकशी केली असता दोघांनी पोलिसांना उडवाउडवीची उत्तरे दिली.  पोलिसांनी चौकशी केली असता दोन्ही टँकरमध्ये बायोडिझेल भरलेले आढळून आले. पोलिसांनी (जीजे १२ बीटी ११८१) आणि (जेजे १२ बीटी ४२८४), अशी दोन्ही वाहने हे एमआयडीसी पोलिस ठाण्यात आणली. पोलिसांनी अधिक तपासणी केली.

    असता, दोन्ही वाहनांमध्ये मिळून एकूण २७ लाख रुपये किमतीचे बायोडिझेल असल्याचे उघडकीस आले. यासंदर्भात पोलिस नाईक विकास सातदिवे आणि सिद्धेश्वर डापकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वाहनचालक सद्दाम सय्यद अकबर (वय २३, रा. बच्छाव, गुजरात) आणि लतीफ फकीर मोहम्मद हिंगोरजा (२४, रा. आडेचार, जि. कच्छ, गुजरात) या दोघांसह टँकरचे मालक ज्ञानेश्वर भारत शेजोळे (२१, रा. उकडी, ता. बुलढाणा) आणि सुलेमान इलियास छेरेया (रा. वरसाना, गुजरात) या चौघांविरोधात एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  या घटनेचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक राहुल तायडे आणि चंद्रकांत धनगे हे करीत आहेत.

     

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    शेतात पाणी भरण्यास निघालेल्या तरुणाचा भीषण अपघातात मृत्यू

    February 16, 2026

    दारूच्या नशेत वाद, तरुणाचा निर्घृण खून; अल्पवयीनसह दोघे ताब्यात

    February 16, 2026

    दौलत नगर परिसरात तरुणाने आयुष्य संपविले !

    February 16, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.