Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » अल्पवयीन मुलाने पळविली १० लाख किमती सोन्याच्या दागिन्याची पिशवी !
    क्राईम

    अल्पवयीन मुलाने पळविली १० लाख किमती सोन्याच्या दागिन्याची पिशवी !

    editor deskBy editor deskFebruary 19, 2025No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    चाळीसगाव : प्रतिनिधी

    धुळेरोडवरील विराम लॉन्समध्ये १० लाख ४१ हजार रुपये किंमतीच्या सोन्याच्या दागिन्यांची पिशवीची चोरी झाल्याची घटना १७ रोजी दुपारी घडल्याने एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान सीसीटीव्ही कॅमेऱ्यात १४ वर्षीय मुलाने ही चोरी केल्याचे स्पष्ट झाले असून त्या दिशेने तपास सुरू आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, भडगाव तालुक्यातील वाडे येथील सुनिल निंबा पाटील यांच्या मुलीचा विवाह १७ रोजी दुपारी विराम लॉन्समध्ये आयोजित करण्यात आला होता. ९ वेगवेगळ्या प्रकारच्या सोन्याच्या दागिन्यांची कापडी पिशवी नवरदेवाची आई अंजली पाटील यांच्याकडे होती.

    जेवण करताना दागिन्यांची कापडी पिशवी खुर्चीखाली ठेवली. जेवण करीत असताना चोरट्याने संधीचा फायदा घेऊन दागिन्यांची पिशवी लंपास केली.  १४  वर्षीय मुलगा ही चोरी करत असल्याचे सीसीटीव्हीत दिसले. या घटनेची माहिती मिळताच ग्रामीण पोलिस स्टेशनचे निरीक्षक राहुलकुमार पवार व त्यांचे सहकारी घटनास्थळी दाखल झाले. सर्व माहिती घेतल्यानंतर पवार यांनी लॉन्समधील सीसीटीव्ही फुटेज पाहिले असता त्यात १४ वर्षे वयोगटातील मुलाने दागिन्यांची पिशवी घेऊन जात असल्याचे दिसून आले. सुनिल पाटील यांच्या फिर्यादीवरून ग्रामीण पोलिसात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.  या गुन्ह्याचा तपास पो. नि. राहुलकुमार पवार स्वतः करीत आहेत

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    सर्वांसमोर झालेला अपमान जीवावर बेतला; २० वर्षीय विद्यार्थ्याच्या मृत्यूने जळगाव हळहळले

    February 17, 2026

    शेतात पाणी भरण्यास निघालेल्या तरुणाचा भीषण अपघातात मृत्यू

    February 16, 2026

    दारूच्या नशेत वाद, तरुणाचा निर्घृण खून; अल्पवयीनसह दोघे ताब्यात

    February 16, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.