Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » जुन्या वादातून तरुणाला जबर मारहाण
    क्राईम

    जुन्या वादातून तरुणाला जबर मारहाण

    editor deskBy editor deskFebruary 18, 2025No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी

    जुन्या वादातून तरूणाला शिवीगाळ करत लाकडी काठीने बेदम मारहाण करून दुखापत केल्याची घटना रविवारी दुपारी दीड वाजता कांचन नगर परिसरातील उज्ज्वल चौकात घडली. ही संपुर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. याप्रकरणी रात्री साडेनऊ वाजता शनीपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    मिळालेली माहितीनुसार, शहरातील कांचन नगरातील चौघुले प्लॉट परिसरात दुर्गेश चंद्रकांत सपकाळे (वय २२) हा तरुण वास्तव्यास आहे. शनिवार दि. १६ फेब्रुवारी रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास दुर्गेश सपकाळे हा कांचन नगरातील उज्ज्वल चौकात उभा असतांना जुन्या वादातून धनंजय उर्फ आकाश बाविस्कर, सागर बाविस्कर, प्रतिक उर्फ प्रेम बाविस्कर, गायकवाड (पुर्ण नाव माहिती नाही) आणि यांच्या सोबत असलेले अनोळखी दोघांनी शिवीगाळ करत मारहाण करण्यास सुरूवात केली. तसेच यातील एकाने हातात लाकडी काठी घेवून मारहाण करत दमदाटी केली आहे. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

    याप्रकरणी अखेर रात्री शनीपेठ पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली. त्यानुसार धनंजय उर्फ आकाश बाविस्कर, सागर बाविस्कर, प्रतिक उर्फ प्रेम बाविस्कर, गायकवाड (पुर्ण नाव माहिती नाही) आणि यांच्या सोबत असलेले अनोळखी दोन व्यक्ती यांच्या विरोधात शनीपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस नाईक किरण वानखेडे हे करीत आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    एलपीजी, पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक !

    March 28, 2026

    मुख्यमंत्री महाराष्ट्राला मूर्ख समजत आहेत का? सरोदेंचा गंभीर आरोप !

    March 28, 2026

    ‘मी शंकर, तू पार्वती’ म्हणत महिलेवर अत्याचार : ऋषीकेश वैद्यला अटक

    March 28, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.