Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » धरणगावच्या व्यावसायिकाची १  कोटीत फसवणूक !
    क्राईम

    धरणगावच्या व्यावसायिकाची १  कोटीत फसवणूक !

    editor deskBy editor deskFebruary 5, 2025No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    धरणगाव : प्रतिनिधी

    जुन्या घराची सौदा पावती करून एक कोटी १५ लाख रुपये घेऊनही मिळकतीची खरेदी करून देण्यास टाळाटाळ करून बांधकाम व्यावसायिक सुनील मधुकर चौधरी (५२, रा. धरणगाव) यांची फसवणूक करण्यात आली. खरेदी होत नसल्याने रक्कम परत मागितल्यानंतर त्यांना जिवे ठार मारण्याची धमकी देण्यात आली. हा प्रकार १५ मे २०२३ ते ३ फेब्रुवारी २०२५ दरम्यान घडला. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात १३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    जळगाव महापालिका हद्दीतील सिटी सर्व्हे क्रमांक २११२/६० या जुन्या बांधीव घराचा व्यवहार ठरवून सौदा पावती करण्यात आली. त्यासाठी चौधरी यांच्याकडून समोरील व्यक्तींनी एक कोटी १५ लाख रुपये घेऊन करारनामा केला. त्यानंतर मिळकतीची खरेदी करून देण्यास टाळाटाळ केली जाऊ लागली. चौधरी यांनी दिलेले एक कोटी १५ लाख रुपये परत मागितले. मात्र त्यांना जिवे ठार मारण्याची धमकी देण्यात आली. पाठपुरावा करून खरेदी होत तर नव्हतीच शिवाय रक्कमही परत मिळत नसल्याने आर्थिक फसवणूक झाली म्हणून सुनील चौधरी यांनी शहर पोलिसात फिर्याद दिली.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    मध्यरात्री घरात घुसून ४८ वर्षीय महिलेचा विनयभंग !

    February 23, 2026

    रुग्णालयात पाच दिवसाच्या नवजात मुलीला सोडून आई फरार !

    February 23, 2026

    चेन्नईच्या समुद्रात जळगावचा जय बेपत्ता; कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर

    February 23, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.