जळगाव : प्रतिनिधी
लोखंडी पट्टी मारून दुखापत केल्याने याविषयी पोलिस ठाण्यात तक्रार देण्यासाठी जात असताना वाटेत दोन जणांनी महिलेला शिवीगाळ करीत तिच्या आईवडिलांना मारहाण केली. ही घटना १५ जानेवारी रोजी रात्री चौघुले प्लॉट परिसरात घडली. या प्रकरणी १६ रोजी शनिपेठ पोलिस ठाण्यात दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
सविस्तर वृत्त असे कि, सुचिता दीपक पाटील (२०, रा. चौघुले प्लॉट) यांचे वडील दीपक शिवनारायण पाटील यांना एकाने लोखंडी पट्टी मारून दुखापत केली होती. याविषयी पोलिस ठाण्यात तक्रार देण्यासाठी जात असताना वाटेत दोन जणांनी अडविले व सुचिता पाटील यांना शिवीगाळ करीत आई-वडिलांच्या हातावर लोखंडी पट्टी मारली. शनिपेठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली