जळगाव : प्रतिनिधी
शहरात अनेक ठिकाणी अपघाताची मालिका सुरु असतांना आज दि.१६ रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास शहरातील शिव कॉलनी जवळ अपघात भरधाव वाहनाची दुचाकीला धडक दिली या धडकेत एकाचा मृत्यू झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एरंडोल तालुक्यातील वैजनाथ येथील भारमल पाटील हे वृध्द आपल्या पत्नीसह वास्तव्याला असून आयुर्वेदीक उपचार करण्यासाठी भारमल पाटील हे जळगावा दुचाकी क्रमांक (एमएच १९ बी डब्ल्यू २७३०) जळगाव शहरात येण्यासाठी निघाले. गुरूवारी १६ जानेवारी रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास शिवकॉलनीजवळील रेल्वे उड्डाणपुलावरून शहराकडे जात असतांना मागून येणाऱ्या अज्ञात ट्रकने त्यांच्या दुचाकीला मागून जोरदार धडक दिली. या धडकेत भारमल पाटील हे रस्त्यावर पडल्याने ट्रकने त्यांना चिरडले आणि ते जागीच ठार झाले. ही घटना घडल्यानंतर परिसरातील नागरीक व जिल्हापेठ पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करून मृतदेह जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. या घटनेबाबत जिल्हापेठ पोलीसात नोंद घेण्याचे काम सुरू होते.