Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » पाच वाहनांचा विचित्र अपघात : अमळनेरचे पती – पत्नी ठार तर मुलगी जखमी !
    अमळनेर

    पाच वाहनांचा विचित्र अपघात : अमळनेरचे पती – पत्नी ठार तर मुलगी जखमी !

    editor deskBy editor deskJanuary 16, 2025No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी

    मुंबई ते नाशिक महामार्गावर पाच वाहनांचा विचित्र अपघात झाला. कंटेनर, ट्रक आणि खासगी बस यांचा १५ रोजी पहाटे ३.३४ वाजता अपघात झाला. या अपघातामध्ये तीन जणांचा जागीच मृत्यू झाला, तर १४ जण जखमी झाले आहेत. मयतात दोघे अमळनेरचे आहेत. तर मुलगी जखमी झाली आहे. तर त्यामधील काही जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई ते नाशिक महामार्गावरील शहापूर येथील पुलावर कंटेनर, ट्रक आणि श्री गणेश राम ट्रॅव्हल्स या खासगी बस एकमेकांना धडकल्याने हा अपघात झाला. महामार्गावर भीषण अपघात झाल्याचे समजताच ग्रामस्थांनी घटनास्थळावर धाव घेत तत्काळ मदतीचा हात पुढे केला होता. त्यानंतर ग्रामस्थांनी अपघातग्रस्तांना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केलेत. यात पीयूष पाटील (वय ३३) आणि वृंदा पीयूष पाटील (वय ३०) यांचा अपघातात मृत्यू झाला आहे. जखमींवर शहापूर उपजिल्हा रुग्णालयासह खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या अपघातात १४ जण जखमी झाले आहेत. यापैकी ८ जणांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना ठाणे येथे पाठवण्यात आले आहे. पीयूष पाटील हे मुंबईतील बीएमसीत नोकरीला होते, तर वृंदा पाटील या बोरगाव येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत युवा प्रशिक्षणार्थी होत्या.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    महामार्गावर भीषण अपघात; भरधाव ट्रकच्या धडकेत मजूर ठार, एक गंभीर !

    February 24, 2026

    वेळ संपल्याने बँड बंद; पुन्हा वाजविण्यास नकार दिल्याने बँडमालकावर हल्ला !

    February 24, 2026

    भरधाव दुचाकीची भीषण धडक; मोठे वाघोद्यात युवकाचा मृत्यू !

    February 24, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.