भडगाव : प्रतिनिधी
पेठ भागात वाळूच्या ट्रॅक्टरचालकाने एकाला चक्क गल्लीत टाकून चालू स्थितीत सोडून ट्रॅक्टर वरून पळ काढला. यावेळी ट्रॅक्टर समोर कुणीही नव्हते, अन्यथा अनर्थ झाला असता.
सविस्तर वृत्त असे कि, भडगाव येथील पेठ भागात एक वाळूचा ट्रॅक्टर वेगाने जात होते. यावेळी महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांनी या ट्रॅक्टरचा पाठलाग सुरू केला. त्यामुळे चालकाने लागलीच रस्ता सोडून ट्रॅक्टर गल्लीत घुसवला. पाठलाग करणाऱ्यांच्या कर्मचाऱ्यांच्या भीतीने ट्रॅक्टर चालूच स्थितीत सोडून चालकाने वरून उडी मारली आणि फरार झाला.
यावेळी सुरू असलेला ट्रॅक्टर बरेच अंतर विनाचालक गल्लीत चालत गेला. पुढे बांधकामाची खडी पडलेली असल्याने त्या खडीजवळ हा ट्रॅक्टर थांबला. ज्याठिकाणी हा ट्रॅक्टर सोडून चालक पळाला, त्या परिसरात शाळकरी मुले व ग्रामस्थही उभे असतात. मात्र घटनेच्या दिवशी शाळेला सुट्टी होते. त्यामुळे हा प्रकार घडला, त्यावेळी नेमके त्या ठिकाणी कुणीही नव्हते. त्यामुळे अनर्थ टळला. नंतर ट्रॅक्टर तहसील कार्यालयात जमा करण्यात आला.