जळगाव : प्रतिनिधी
भरधाव दुचाकी व कारची समोरासमोर धडक होऊन दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले. दुचाकीस्वार तरुण दुचाकीसह शेजारी असलेल्या गटारीत जाऊन पडला व किरकोळ जखमी झाला. ही घटना बुधवारी सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास शिवरामनगरात घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास शिवरामनगर परिसरातून एक तरुण दुचाकीने भरधाव वेगाने जात असताना समोरून येणाऱ्या कारची समोरासमोर धडक झाली. यात कारच्या पुढील भागाचा चुराडा झाला. एअरबॅग उघडल्यामुळे कारचालक बालंबाल बचावला. रात्री उशिरापर्यंत पोलिसात कुठलीही नोंद करण्यात आली नव्हती.