जळगाव : प्रातिनिधी
भुसावळ शहरात शुक्रवारी सकाळी डीडी कोल्ड्रिंग्सच्या दुकानामध्ये गोळीबार करुन खुनाची घटना घडली होती. याप्रकरणी भुसावळ पोलिसांनी या खुनाचा छडा लावला आहे. पोलिसांनी जलदगती तपास करत या प्रकरणातील 5 संशयित आरोपींना अटकेत घेतले आहे. तसेच त्यांच्याकडून 4 पिस्तूल अन् 3 काडतूस जप्त करण्यात आली आहे. त्याच्यावर भुसावळ पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणातील मयत तेहरीम अहमद नासीर अहमद हा त्यांच्या साथीदारांसह शालीमार हॉटेमध्ये चहा घेण्यासाठी गेला होता. यावेळी सकाळी साडेसात वाजता तनवीरवर गोळीबार करण्यात आला या गोळीबारामध्ये त्याचा जागीच मृत्यू झाला. या गोळीबारामध्ये संशयित आरोपी तनवीर माजीद पटेल, अनवर पटेल, रमीज पटेल, शेख साहील शेख रशीद यांनी मारहाण अन् शिवीगाळ करत गोळीबार केला. या कटामध्ये संशियित आरोपी मजीद पटेल अदनान उर्फ काल्या शेख युनुस यांनी यांच्यासह 4 यांचे सोबत संगनमत करून कट रचुन तेहरीम अहमद नासीर शेख याचा खुन केला आहे. म्हणुन संशयित आरोपी तनवीर मजीद पटेल, अनवर पटेल, रमीज मटेल, शेख साहील शेख रशिद, मजीद पटेल, अदनान उर्फ काल्या शेख युनुरा सर्व रा. भुसावळ याचे विरुद्ध भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनलामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.