जळगाव : प्रतिनिधी
जळगाव जिल्हाधिकारी श्री.आयुष प्रसाद सर यांनी जिल्हा महिला बालविकास विभागाच्या मासिक आढावा बैठकीत जिल्ह्यातील बालविवाह निर्मूलन जनजागृती संदर्भात आदेश दिले असता. मा.जिल्हा महिला बालविकास अधिकारी श्री आर.आर.तडवी सर यांनी जिल्ह्यातील हॉटस्पॉट १७० गावांची निवड केली .
जिल्हा महिला बालविकास विभाग व युनिसेफ, एसबीसी – थ्री यांच्या आर्थिक साहाय्याने जळगाव जिल्ह्यातील 50 हॉटस्पॉट गावांमध्ये बालविवाह निर्मूलन जनजागृती कार्यक्रम घेण्यात आले.
यासाठी सर्वप्रथम युनिसेफ एसबीसी – ३ समन्वयकांकडून विद्यार्थ्यांना प्रशिक्षित करण्यात आले यामध्ये बालविवाह निर्मूलनाची संपूर्ण माहिती PPT च्या सहाय्याने दाखवली – कायदा, तरतुदी, निकष, बालविहाचे परिणाम, कारणे, व NFHS -4 आणि NFHS -5 नुसार जळगाव जिल्ह्यातील बालविवाहाचे प्रमाण , तसेच शॉर्ट फिल्मच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये लिंग समानता व मुलींच्या आयुष्यावर होणारे बालविवाहाचे वाईट परिणाम दाखवण्यात आले. कार्यक्रम घेण्यासाठी आवश्यकते साहित्य युनिसेफ एसबीसी थ्री कडून देण्यात आले.
निवडक पन्नास गावात 31 डिसेंबर पर्यंत कार्यक्रम घेण्यात आले. पथनाट्याचे ग्रुप -उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ समाजकार्य विभाग ,जळगाव विद्यार्थी – चेतन राठोड व टीम , आधार फाउंडेशन, अमळनेर – आनंद पगारे ,प्रकल्प समन्वयक व टीम यांनी कार्यक्रम घेतले.
विद्यार्थ्यांसोबत रॅली , पथनाट्य, व्यवसाय पुरवठादारांच्या भेटी , पोस्टर चिटकवणे , बालविवाह निर्मूलन शपथ घेणे, महिला बचतगट बैठक ह्या द्वारे मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात आली.
संपूर्ण कार्यक्रमांचे नियोजन रुचिका प्रशांत इंगळे , युनिसेफ एसबीसी -३ जिल्हा प्रकल्प समन्वयक व नंदू जाधव युनिसेफ एसबीसी -३ जिल्हा प्रकल्प समन्वयक यांनी केले. सदर कार्यक्रम राबवण्यात पवन पाटील, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी, मीनाक्षी कोळी, परीविक्षा अधिकारी, यांचे सहकार्य लाभले.



