जळगाव : प्रतिनिधी
मारहाण करणाऱ्यांविरुद्ध पोलिस ठाण्यात तक्रार देऊनही संबंधितांवर कारवाई होत नसल्याने जामनेर तालुक्यातील रांजणी येथील तक्रारदार महिलेसह इतर महिला थेट पोलिस अधीक्षक कार्यालयात पोहचल्या. यावेळी पोलिसांना निवेदन देण्यात आले असून कारवाई करावी, अन्यथा आंदोलनास बसण्याचा इशारा दिला आहे.
या संदर्भात संगीता दिलीप मगरे (मु. पो. राजणी, ता. जामनेर) यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर २३ नोव्हेंबर रोजी राजणी गावात कार्यकर्ते बैंड लावून नाचत होते. त्यावेळी एक जणाने गाणे बंद करा, असे म्हणत वाद घालत मारहाण केली. या संदर्भात संगीता मगरे यांनी फत्तेपूर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. मात्र कारवाई होत नसल्याचे तक्रारदार महिलेचे म्हणणे आहे. मारहाण करणारे गावात फिरत असून तक्रार मागे घेण्यासाठी ते दबाब टाकत असल्याचे निवेदनात नमूद करीत संबंधितांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली आहे.