अमळनेर : प्रतिनिधी
शेताच्या वादावरून पोलिसाला सख्खा भाऊ आणि पुतण्याने मारहाण केल्याची घटना शनिवारी सकाळी ११ वाजता जानवे येथे घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, गुरुदास अर्जुन पाटील (५२, जानवे) (मुंबई पोलिस) हे ३० रोजी त्यांच्या वडिलोपार्जित शेतीत रोटा मारण्यासाठी ट्रॅक्टर घेऊन गेले असता त्यांचा भाऊ ट्रॅक्टर पुढे येऊन शिवीगाळ करत धमकी दिली. तसेच त्याने हातातील लाकडी दांडक्याने मारहाण केल्याने गुरुदास यांच्या तोंडातून रक्त येऊ लागले. पुतण्या कल्पेश चंद्रकांत पाटील यानेदेखील लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यावेळी आजूबाजूच्या लोकांनी भांडण आवरले. तेव्हा चंद्रकांत पाटील याने ठार मारण्याची धमकी दिली. दवाखान्यातून उपचार घेऊन आल्यावर गुरुदास यांनी अमळनेर पोलिस स्टेशनला फिर्याद दिल्यावरून चंद्रकांत पाटील व कल्पेश यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतचा अधिक तपास हे.कॉ. कैलास शिंदे करत आहेत.