• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

बँकेच्या ड्रॉप बॉक्समधून धनादेश चोरी अन २ लाख ५८ हजार खात्यामधून वटवले !

editor desk by editor desk
December 2, 2024
in क्राईम, जळगाव
0
पाचोरा : नोकरीचे आमिष दाखवून तरुणाची ५ लाखांत फसवणूक !

जळगाव : प्रातिनिधी

एका खासगी बँकेतील धनादेश पेटीतून (चेक ड्रॉप बॉक्स) धनादेश चोरून, त्यावर रासायनिक प्रक्रियाद्वारे स्वतःचे नाव टाकून ते धनादेश राज्यातील इतर बैंक खात्यामधून वटवून २ लाख ५८ हजार रुपयांचा गैरव्यवहार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात एका अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादीत म्हटल्याप्रमाणे विसनजी नगरातील बैंक ऑफ बडोदा येथे ग्राहकांच्या सुविधेसाठी धनादेश पेटी (चेक ड्रॉप बॉक्स) सुविधा उपलब्ध करून दिली आहे. बँकेकडून दिवसातून तीन वेळा या पेटीत असलेले धनादेश काढून त्यावर पुढील कार्यवाही केली जाते. ४ ते ७ नोव्हेंबरपर्यंत त्यांच्या बँकेत काही ग्राहकांनी लेखी तक्रार देत त्यांच्या खात्यात त्यांनी २२ व २३ ऑक्टोबर रोजी धनादेश व डिमांड ड्राफ्ट वटले गेले नसून त्याची रक्कमदेखील त्यांच्या खात्यात जमा झाली नसल्याची तक्रार केली होती. त्यानुसार तक्रारदारांच्या अर्जाची दखल घेत बँकेने चौकशी केली असता, त्यांना कार्यालयीन कामकाजात कुठलाही दोष आढळून आली नाही.

मात्र, ज्या खातेदारांच्या नावाने धनादेश दिला होता, त्यांच्याकडून माहिती घेतल्यानंतर त्या धनादेशावरील नाव रासायनिक पद्धतीने मिटवून त्यावर बोगस अनोळखी व्यक्तीचे नाव टाकून ते धनादेश इतर राज्यातील दुसऱ्या बँकेत जमा झाल्याचे उघड झाले. बँकेकडून सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करण्यात आली. यामध्ये दोन्ही दिवशी दोन वेगवेगळ्या व्यक्ती बँकेतील धनादेश पेटीतून धनादेश काढून त्याचे कुलूप पूर्ववत लावत असल्याचे आढळून आले, या प्रकरणी शनिवारी मुख्य प्रबंधक विमलेश कुमार वर्मा यांच्या फिर्यादीवरून जिल्हापेठ पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे

Previous Post

तीन वाळूचे वाहन महसूलने केले जप्त

Next Post

भाऊ आणि पुतण्याने केली पोलिसाला मारहाण

Next Post
‘त्या’ पोलिसाला मारहाण करणारे दोन अटकेत !

भाऊ आणि पुतण्याने केली पोलिसाला मारहाण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

४८ वर्षीय महिलेच्या खून प्रकरणी संशयित ताब्यात !
क्राईम

४८ वर्षीय महिलेच्या खून प्रकरणी संशयित ताब्यात !

June 29, 2025
शिक्षण घेवून घरी येणाऱ्या तरुणाला लुटले !
क्राईम

दुकानाजवळ येऊन टोळक्याने केली एकाला जबर मारहाण !

June 29, 2025
ते आले दरोडा टाकण्याच्या तयारीत अन पोलिसांनी घेतले ताब्यात !
क्राईम

गॅस सिलिंडरचा बेकायदेशीररित्या घरात साठा : पोलिसात गुन्हा दाखल !

June 29, 2025
जळगावात  तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला !
क्राईम

जुन्या वादातून तिघांनी केली दोघांना जबर मारहाण !

June 29, 2025
दिशा स्पधी परीक्षा केंद्राचे मार्गदर्शक पाटील यांची लिपिकपदी निवड
जळगाव

दिशा स्पधी परीक्षा केंद्राचे मार्गदर्शक पाटील यांची लिपिकपदी निवड

June 29, 2025
या राशींना उत्तम असे नवीन वर्ष !
राशीभविष्य

या राशीतील लोकांना आज पैसे खर्च करूनही तुम्हाला शांतता मिळणार नाही.

June 29, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group