Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » मेडिकल चालकाची सहा लाखांत फसवणूक !
    क्राईम

    मेडिकल चालकाची सहा लाखांत फसवणूक !

    editor deskBy editor deskDecember 1, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी

    सैन्य दलात औषध साठ्याची आवश्यकता असल्याचे सांगून एका अनोळखी व्यक्तीने सुनील भिवसन चौधरी (वय ५५, रा. सुदर्शन भवन, चाळीसगाव) यांना ६ लाख ७ हजार ७०० रुपयात ऑनलाइन गंडविल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी शनिवारी सायबर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

    फिर्यादीनुसार, सुनील चौधरी यांना २३ नोव्हेंबर रोजी एका अनोळखी व्यक्तीने मोबाइलवरून संपर्क साधला. मी चाळीसगाव ग्रेस अकॅडमी मिलिटरी डिपार्टमेंटमधून बोलत असल्याचे सांगून आमच्या डिपार्टमेंटला औषधांची आवश्यकता आहे, त्यानुसार तुम्ही औषधी पाठवा, असे सांगितले.

    औषधांची यादी मिळाल्यावर संशयिताने ‘फोन पे’वरून दहा रुपये पाठविण्यास सांगितले. चौधरी यांनी दहा रुपये पाठविल्यावर ठगाने त्यांना २० रुपये पाठविले. त्यानंतर सुनील चौधरी यांचा मुलगा जयदीप याला त्यांच्या मोबाइलच्या फोन पे अॅपमधील इंटर क्रेडिट कार्ड डिटेल्स, बँकेचे नाव व १ लाख ३९ हजार ५८० रुपयांचा तपशील पाठविण्यास सांगितले. त्यानंतर ठगाने चौधरी यांच्या बँक खात्यातून ६ लाख ७ हजार ७०० ऑनलाइन काढून घेतले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर चौधरी यांनी प्रथम चाळीसगाव नंतर जळगावला सायबर पोलिस ठाणे गाठून तक्रार दिली.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    भुसावळात शस्त्रसाठा उघड; तरुणाच्या अटकेने सुरक्षा प्रश्न ऐरणीवर

    May 3, 2026

    शॉर्टसर्किटचा कहर; चटई कंपनीपासून तीन कंपन्यांपर्यंत आगीचा फैलाव

    May 3, 2026

    हळदीच्या कार्यक्रमाहून परतताना अपघात, तरुण ठार तर एक जखमी !

    May 3, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.