जळगाव : प्रतिनिधी
भरधाव डंपरने दिलेल्या धडकेत चंद्रभान तोताराम सोनवणे (रा.आमोदा) दुचाकीस्वार गंभीर जखमी झाल्याची घटना तालुक्यातील किनोद-भोकर रस्त्यावर घडली. याप्रकरणी गुरुवारी २८ नोव्हेंबर रोजी जळगाव तालुका पोलिस ठाण्यात डंपरवरील अज्ञात चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला.
मिळालेल्या माहितीनुसार, २७ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास चंद्रभान सोनवणे हे त्यांच्या दुचाकीने किनोद-भोकर या रस्त्याने दुचाकीने जात असताना समोरून येणाऱ्या डंपरने (क्र. एमएच १९ झेड १६४२) जोरदार धडक दिली. या धडकेत चंद्रभान हे गंभीर जखमी झाले. त्यांना जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले