• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

जळगावात १८ लाखांची घरफोडी चोरटा धुळ्यातून ताब्यात

editor desk by editor desk
November 30, 2024
in क्राईम, जळगाव
0
जळगावात १८ लाखांची घरफोडी चोरटा धुळ्यातून ताब्यात

जळगाव : प्रतिनिधी

शहरातील रामानंद नगर परिसरात १८ लाखाची घरफोडी करणाऱ्या साहिल प्रवीण झाल्टे उर्फ साहिल शेख (रा. पवन नगर, धुळे) याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सलग दोन मुक्काम ठोकून धुळ्यातून अटक केली. त्याने गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली. त्यास शुक्रवारी न्यायालयाने त्याला तीन दिवसाची पोलिस कोठडी सुनावली.

रामानंद नगरात ६ ऑक्टोबर रोजी दुपारी दोन वाजता वनिता जगन्नाथ चौधरी या प्रवचनाला गेल्या असता चोरट्यांनी दरवाजाचे कुलूप तोडून १८ लाखांचा ऐवज चोरून नेला होता. ही घरफोडी दिवसा झाल्यामुळे पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी व अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांनी अशा प्रकारचे गुन्हे करणाऱ्यांची कुंडली काढण्याचे आदेश दिले. ही घरफोडी धुळे येथील रेकॉर्डवरील गुन्हेगार साहिल प्रविण झाल्टे उर्फ साहिल याने केल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांना मिळाली होती. त्यानुसार आव्हाड यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक दत्तात्रय पोटे, सहायक फौजदार रवी नरवाडे, विजयसिंग पाटील, संजय हिवरकर, अतुल वंजारी, विजय पाटील, हरीलाल पाटील, राजेश मेढे, प्रदिप चवरे, अक्रम शेख, ईश्वर पाटील अशांचे पथक रवाना केले होते.

Previous Post

व्यवसायात केलेले बदल फायदेशीर ठरणार !

Next Post

वृद्धाच्या घरात चोरट्यांचा डल्ला : साडेपाच लाखांचा मुद्देमाल लंपास

Next Post
घर फोडीकरीत लाख रुपयांचे सोने चांदीचे दागिने आणि रोकड लंपास

वृद्धाच्या घरात चोरट्यांचा डल्ला : साडेपाच लाखांचा मुद्देमाल लंपास

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

ठाकरे बंधूंच्या मोर्चावर मुख्यमंत्री फडणवीसांचा हल्लाबोल !
राजकारण

ठाकरे बंधूंच्या मोर्चावर मुख्यमंत्री फडणवीसांचा हल्लाबोल !

June 28, 2025
…तर एक महत्त्वाचा सामाजिक मुद्दा आहे ; खा.सुळे आक्रमक !
राजकारण

…तर एक महत्त्वाचा सामाजिक मुद्दा आहे ; खा.सुळे आक्रमक !

June 28, 2025
चोपडा धरणगाव रस्ता बनला मृत्यूचा सापळा
जळगाव

चोपडा धरणगाव रस्ता बनला मृत्यूचा सापळा

June 28, 2025
औष्णिक विद्युत केंद्रात कंत्राटी कामगाराचा मृत्यू !
क्राईम

औष्णिक विद्युत केंद्रात कंत्राटी कामगाराचा मृत्यू !

June 28, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

दोन दुचाकींचा भीषण अपघात : चार जण जखमी !

June 28, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

 जळगावात वेगवेगळ्या ठिकाणच्या अपघातांत तीन जण जखमी

June 28, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group