Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » जळगावातून सोन्याचे मणी घेऊन कामगार पसार
    क्राईम

    जळगावातून सोन्याचे मणी घेऊन कामगार पसार

    editor deskBy editor deskNovember 29, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी

    सुवर्ण व्यावसायिकाला देण्यासाठी कारागिराने दिलेले ९७ हजार ५०० रुपये किमतीचे सोन्याचे मणी घेऊन दुकानातील कर्मचारी परस्पर पसार झाला. हा प्रकार दि. १४ ऑगस्ट रोजी घडला. याप्रकरणी दि. २७ नोव्हेंबर रोजी शनिपेठ पोलिस ठाण्यात योगेश भगवान गोयल (३२) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, अंकुश पुंडलिक सोनवणे (३२, रा. श्रीकृष्णनगर, विठ्ठल पेठ) हे सोने घेऊन त्याचे दागिने तयार करण्याचे काम करतात. दि. १४ ऑगस्ट रोजी त्यांनी योगेश गोयल याच्याकडे ऑर्डरचे ९७ हजार ५०० रुपये किमतीचे १३ ग्रॅम वजनाचे ७८ सोन्याचे मणी दिले. ते सराफ बाजारातील सुवर्ण व्यावसायिकाकडे देण्याचे सांगितले. परंतु योगेश गोयल याने ऑर्डरची डिलिव्हरी न करता मणी घेऊन पसार झाला. याप्रकरणी अंकुश सोनवणे यांनी शनिपेठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून योगेश गोयलविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास सहायक फौजदार रघुनाथ पवार करीत आहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    भाजप-काँग्रेस वाद रंगला; तुषार दामगुडे-हनुमंत पवार मारहाणी प्रकरण उघडकीस

    February 25, 2026

    जमावाच्या संतापाचा कहर; बेदम मारहाणीत अनोळखी तरुणाचा अंत

    February 25, 2026

    तलवार घेऊन जारगाव चौफुलीत दहशत; पाचोरा पोलिसांची झटपट कारवाई !

    February 25, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.