जळगाव : प्रतिनिधी
जुन्या वादातून एका महिलेच्या बंद घराचा दरवाजा तोडून घरातील साहित्याची तोडफोड करीत आग लावून घर जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला. हा प्रकार २१ नोव्हेंबर रोजी राजमलती नगरात घडला. २७ नोव्हेंबर रोजी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नाजेमा परवीन राजू पटेल (४६) या महिलेचे घर बंद असताना सहा ते सात जणांनी बंद घराचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला. तोडफोड करत काही घर जाळण्याचा प्रयत्न केला. याविषयी महिलेच्या फिर्यादीवरून सहा ते सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोउनि रामचंद्र शिखरे करीत आहेत.