• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

खळबळजनक : स्वतःच्या दोन चिमुकल्यांवर कुऱ्हाडीने वार करीत केले ठार

editor desk by editor desk
November 27, 2024
in क्राईम, जळगाव
0
खळबळजनक : स्वतःच्या दोन चिमुकल्यांवर कुऱ्हाडीने वार करीत केले ठार

चोपडा : प्रतिनिधी

तालुक्यातील गौऱ्यापाडा येथील संजय नानसिंग पावरा (२३) याने चारित्र्याच्या संशयावरून संतापाच्या भरात स्वतःच्या दोन चिमुकल्यांना कुन्हाडीने वार करून ठार केले; सुदैवाने १९ वर्षीय पत्नी बचावली पण ती गंभीर जखमी झाली आहे. ही घटना मध्य प्रदेशात शनिवारी घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, गौऱ्यापाडा येथे हे दाम्पत्य पाच वर्षांचा मुलगा डेव्हिड आणि तीन वर्षाची मुलगी डिंपल यांच्यासह राहत होते. आरोपीचे पत्नीसोबत १८ नोव्हेंबरला जोरदार भांडण झाले. त्यामुळे पत्नी मुलीसह मध्यप्रदेशच्या सीमेवरील तिच्या आत्याच्या गावी रांजणगाव येथे निघून गेली. संजयच्या आई-वडिलांनी तेथे जाऊन भांडण केले. त्यानंतर नातेवाईक तिला माहेरी देवली येथे घेऊन गेले. त्यानंतर पती मुलाला घेऊन देवलीत दाखल झाला. यावेळी पत्नीसोबत झालेल्या भांडणात त्याने कुऱ्हाडीचे वार करून दोन्ही मुलांना जागीच ठार केले. पत्नीच्या डोक्यावरही कुन्हाडीने पाच ते सहा वार केले.

लोकांनी आरोपीला पोलिसांच्या स्वाधीन केले. याप्रकरणी मध्य प्रदेशातील वरला पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संजयला वरला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. गंभीर जखमी पत्नीला मेंदूपर्यंत मार लागला असल्याने तिच्यावर धुळे येथील शासकीय रुग्णालयामध्ये शस्त्रक्रिया करण्यात आली असून ती मृत्यूशी झुंज देत आहे.

Previous Post

या राशीतील लोकांची आरोग्याच्या समस्येतून मुक्ती मिळणार !

Next Post

ग्राहकांना मोठा दिलासा : सोन्यासह चांदीचे दर घसरले !

Next Post
सोने – चांदी झाले स्वस्त ; जाणून घ्या काय राहणार भाव

ग्राहकांना मोठा दिलासा : सोन्यासह चांदीचे दर घसरले !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

चोपडा

धरणगाव चोपडा रस्ता ठेकेदारासाठी पैसे कमवण्याचे एटीएम

June 27, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

भरधाव चारचाकीचा भीषण अपघातात तीन ठार तर दोन गंभीर !

June 27, 2025
राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !
राजकारण

राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !

June 27, 2025
धरणगाव तालुक्यातील शेतकऱ्याचा मका जळून खाक !
क्राईम

धरणगावात खळबळ : ७३ वर्षीय वृद्ध महिलेच्या घरात घुसून अज्ञात हल्लेखोराने जीवघेणा हल्ला !

June 27, 2025
खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !
क्राईम

खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !

June 27, 2025
बोदवडात चोरी केल्याप्रकरणी महिलेस दोन दिवस पोलीस कोठडी
क्राईम

पुण्याचे तरुण दरोड्याच्या तयारीत असतांना चोपड्यात अटक !

June 27, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group