Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » भरधाव वाहनाच्या धडकेत पादचारी तरुण ठार
    क्राईम

    भरधाव वाहनाच्या धडकेत पादचारी तरुण ठार

    editor deskBy editor deskNovember 26, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी

    भरधाव वाहनाने धडक दिल्यामुळे विकास आत्माराम चौधरी (३४, रा. गारखेडा बु, ता. जामनेर) या पादचाऱ्याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना रविवारी मध्यरात्री जळगाव ते छत्रपती संभाजीनगर महामार्गावर रेमंड चौकाच्या पुढे घडली.

    मिळालेल्या माहितीनुसार, मूळचे जामनेर तालुक्यातील रहिवासी असलेले विकास चौधरी हे जळगावात एका हॉटेलमध्ये कामाला होते. रविवारी रात्री ते पायी जात असताना मागून येणाऱ्या अज्ञात वाहनाने त्यांना जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. धडक दिल्यानंतर चालक वाहन घेऊन पसार झाला. काही जणांनी पोलिसांना माहिती दिली. त्यावेळी मयताला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नेले.

    खिशात आढळलेल्या कागदपत्रांवरून जामनेर तालुक्यातील विकास चौधरी यांचा मृतदेह असल्याचे निष्पन्न झाले. मयताची आई व बहीण पुणे येथे राहतात. धडक देऊन पसार झालेल्या वाहन चालकाचा पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    भाजप-काँग्रेस वाद रंगला; तुषार दामगुडे-हनुमंत पवार मारहाणी प्रकरण उघडकीस

    February 25, 2026

    जमावाच्या संतापाचा कहर; बेदम मारहाणीत अनोळखी तरुणाचा अंत

    February 25, 2026

    तलवार घेऊन जारगाव चौफुलीत दहशत; पाचोरा पोलिसांची झटपट कारवाई !

    February 25, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.