Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » जळगावात १५ वर्षीय विद्यार्थ्याने संपविले आयुष्य !
    क्राईम

    जळगावात १५ वर्षीय विद्यार्थ्याने संपविले आयुष्य !

    editor deskBy editor deskNovember 26, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी

    आईवडील रुग्णालयात तपासणीसाठी तर आजी शेजाऱ्यांकडे गेलेली असताना घरी एकटा असलेल्या ओम ऊर्फ साई पंडित चव्हाण (१५, रा. गणेश कॉलनी) या इयत्ता नववीतील विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही धक्कादायक घटना सोमवारी (२५ नोव्हेंबर) दुपारी ३ वाजता समोर आली. आईवडील घरी आल्यानंतर त्यांना मुलगा गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसला. या विद्यार्थ्याने एवढा टोकाचा निर्णय का घेतला, याचे नेमके कारण स्पष्ट झाले नाही.

    मिळालेल्या माहितीनुसार, रिअल इस्टेटचा व्यवसाय असलेले पंडित चव्हाण हे पत्नी, आई, एक मुलगा व एका मुलीसह गणेश कॉलनी परिसरात राहतात. सोमवारी दुपारी ते पत्नीसह खासगी रुग्णालयात गेले होते. त्यावेळी त्यांचा मुलगा ओम हा घरी अभ्यास करीत होता. त्याची आजी शेजारच्यांकडे गेल्या व घरी एकटा असलेल्या साई याने गळफास घेतला. दुपारी तीन वाजेच्या सुमारास चव्हाण दाम्पत्य घरी आले. त्यावेळी दार आतून लावलेले होते. त्यांनी दार ठोठावले; मात्र प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी खिडकीतून आत पाहिले असता मुलगा गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसला. त्यांनी आरडाओरडा केली, त्यावेळी शेजारील मंडळी तेथे आली. दार तोडून ओमला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नेले. तेथे डॉक्टरांनी त्यास मयत घोषित केले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    भाजप-काँग्रेस वाद रंगला; तुषार दामगुडे-हनुमंत पवार मारहाणी प्रकरण उघडकीस

    February 25, 2026

    जमावाच्या संतापाचा कहर; बेदम मारहाणीत अनोळखी तरुणाचा अंत

    February 25, 2026

    तलवार घेऊन जारगाव चौफुलीत दहशत; पाचोरा पोलिसांची झटपट कारवाई !

    February 25, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.