धरणगाव : प्रतिनिधी
चोपडा रस्त्यावरील एका दुकानात गावठी हातभट्टीची दारू विक्री होत असल्याचे समजताच धरणगाव पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक श्री पवन देसले यांनी आपल्या पथकासह कार्यवाही केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस निरीक्षक श्री पवन देसले, पोकाँ/1912 सुमीत बावीस्कर, पोकाँ/372/ चंदन पाटील, पोहेकाँ/1995 समाधान भागवत असे सरकारी वाहन नं MH19CZ8561 ने विधानसभा निवडणुक 2024 चे अनुशंगाने दिनांक १९ नोव्हेबर रोजी पेट्रोलींग करत असतांना, आम्ही धरणगाव शहरातुन चोपडा रोडने जात असतांना आम्हास चोपड़ा रोडवरील यश कोल्डीक्स दुकानात काऊंटरवर गर्दी दिसली. तेव्हा आम्ही गाडी थांबवुन पोलीस निरीक्षस सो यांचेसोबत आम्ही सर्व स्टाफने तेथे चेक केले असता आम्हास काऊंटरजवळ एक 35 लीटरचा काळ्या रंगाचा कॅन दिसुन आला. त्यात आम्हास दारूसारखा वास आल्याने बघीतले असता त्याचेत गावठी हातभट्टीची दारू मिळुन आली. तसेच एका बादलीत प्लास्टीकचे पीशवीत पॅक केलेले भरपुर प्लास्टीकचे पाकीटे गाहभचे दारूचे मिळुन आले. तेव्हा तेथे असलेला राजेंद्र सुकलाल मराठे रा यश कोल्डीक्स मागे चोपडा रोड धरणगाव हा पळुन गेला. त्यानंतर आम्ही त्यांचे तेथे असलेले संडासचा दरवाजा बंद असलेने लाथ मारून उघडला असता संडासमध्ये एक मातीचा माठ अंदाजे 30 लीटरच दिसुन आला. त्यात चेक केले असता त्याचेत सुध्दा गाहभची दारू मिळुन आली. तेव्हा आम्ही लागलीच दोन पंच जागीच पोकाँ/1912 सुमीत बावीस्कर यांना बोलावणेस सांगीतले. त्यानंतर सदर पंच आलेवर त्यांचेसमक्ष आम्ही स्वताहा पंचनामा केला. तरी यश कोल्ड्रीक्स येथे खालीलप्रमाणे गाहभचा माल मिळुन आला.
(1)6500/- रूपये किमतीची गावठी हातभट्टी दारू सुमारे 65 लीटर त्यात एका 35 लीटरचे प्लास्टीक कॅनमध्ये असलेली व 30 लीटर गावठी हातभट्टी दारू एका मातीचे मटक्यात असलेली तिचेतुन एका 180 एमएल मापाचे बाटलीत गावठी हातभटटी दारू पंचासमक्ष नमुन्याची काढुन उर्वरीत पंचनामा करून ताब्यात घेतली आहे. तरी वरिलप्रमाणेची गावठी हातभट्टी दारू मिळुन आल्याने त्यातून पंचासमक्ष नमुन्याची 180 एमएल मापाचे बाटलीत गावठी हातभटटी दारू पंचासमक्ष काढुन सिलबंद करून गुन्ह्याचा घटनास्थळाचा पंचनामा पोलीस निरीक्षक पवन देसले यांनी जागीच हजर असलेल्या पंचासमक्ष केला आहे. तसेच गावठी हातभट्टीचा उर्वरीत माल जागीच नष्ट केला आहे.
तरी आज दिनांक 19/11/2024 रोजी 18.00 वा. चे सुमारास यश कोल्डीक्स मागे चोपडा रोड धरणगाव येथे राजेंद्र सुकलाल मराठे हा गावठी हातभट्टीची विनापरवाना चोरटी विक्री करतांना कब्ज्यात बाळगतांना दिसून आला व पोलीसांना पाहुन पळुन गेला म्हणुन माझी राजेंद्र सुकलाल मराठे रा यश कोल्डीक्स मागे चोपडा रोड धरणगाव यांचेविरूध्द मुंबई दारुबंदी कायदा कलम 65 (ई) प्माणे कायदेशीर फिर्याद आहे.