यावल : प्रतिनिधी
येथील फॉरेस्ट नाक्याजवळ पैसे वाटप करण्यात येत असल्याच्या गैरसमजातून ठेकेदाराच्या चारचाकी वाहनाच्या तोडफोड प्रकरणात शेखर पाटील हे मारेकऱ्यांचे लक्ष असल्याचे निष्पन्न झाल्याने पोलिस प्रशासनाच्या वतीने त्यांना संरक्षण देण्यात आले आहे.
या संदर्भातील वृत्त असे की, सावखेडा सिम तालुका यावल येथील कमलाकर तुळशीराम पाटील हे आपल्या चारचाकी वाहनाने घरी जात असतांना फॉरेस्ट नाक्याजवळ अचानक पाच ते सहा गुंडांनी ते एका राजकीय पक्षाचे शेखर पाटील असल्याचे समजून हल्ला करून कमलाकर पाटील यांना शिवीगाळ करून मारहाण करीत त्यांच्या चारचाकी वाहनाची लोखंडी रॉडने तोडफोड केली.
मारहाण करणाऱ्यांमध्ये एकाने ही व्यक्ती शेखर पाटील नाही, असे म्हटल्यावर पाटील यांना सोडून ते मारहाण करणारे गुंड त्या ठिकाणाहून पसार झाले. या घटनेच्या पार्श्वभूमीवर पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेडी यांनी घटनेची गंभीर दखल घेत यावल पंचायत समितीचे माजी गटनेते शेखर पाटील यांना पोलिस रक्षक देण्यात येऊन सुरक्षा प्रदान करण्यात आली आहे. तर या घटनेमुळे शहरात भीतीचे वातावरण पसरले आहे