जळगाव : प्रतिनिधी
डाव्या साईडने ओव्हरटेक करणाऱ्या टॅकरला मागून भरधाव वेगाने येणाऱ्या वाहनाने जोरदार धडक दिली. या अपघातात वरणगाव येथील आयुध निर्माणी येथील वाहनाचा अपघात झाला. यामध्ये धडक देणाऱ्या वाहनातील चालक गंभीर जखमी झाला. ही घटना मंगळवारी रात्री दहा सव्वा दहा वाजेच्या सुमारा शिवकॉलनी स्टॉपजवळ घडली. जखमीवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वरणगाव येथील आयुध निर्माणी येथील (एमएच- १९, एम ९४५३) क्रमांकाचे वाहन मंगळवारी रात्री सव्वा दहा वाजेच्या सुमारास धुळ्याकडून जळगावला येत होते. शहरातील शिवकॉलनी स्टॉपजवळ वाहना पुढे चालणाऱ्या (जीजे ०६, बीव्ही- १४६१) – क्रमांकाच्या केमिकलच्या टँकरला मागून येणारे वाहन डाव्या बाजूने ओव्हरटेक करीत होते. दरम्यान, ओव्हरटे करीत असतांना वाहनाने टैंकरला मागून जोरदार धडक दिली. यामध्ये वरणगाव येथील वाहनाची कॅबिनचा पुर्णपणे चुराडा होवून चालक गंभीर जखमी झाला. या अपघातामुळे महामार्गावरील वाहतुक खोळंबली असून वाहनांच्या लांबच लांब रांगा ला लागलेल्या होत्या.
घटनेची माहिती मिळताच जिल्हापेठ पोलिसांसह रामानंद नगर पोलीस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी नागरिकांच्या मदतीने चालकाने चालकाने गंभीर जखमी झालेल्या चालकाला वाहनातून बाहेर काढीत तात्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल केले. चालकावर उपचार सुरु असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.