जळगाव : प्रतिनिधी
इच्छा देवी चौकात वाहनात न अवैधरित्या गॅस भरताना झालेल्या स्फोटातील जखमींपैकी पुणे येथील रुग्णालयात उपचार सुरु असलेल्या संजय गणेश तेरवडीया (रा. गणेश पेठ, पुणे) यांचा बुधवारी रात्रीच्या सुमारास मृत्यू झाला. त्यामुळे गॅस रिफिलींग स्फोटातील मृतांची संख्या ही पाचवर पोहचली.
मागील आठवड्यात वाहनात गॅस रिफिलींग करतांना सिलींडरचा स्फोट होवून ११ जण गंभीर जखमी झाले होते. त्यामध्ये वाहनात बसलेल्या सात ते जणांसह गॅस भरणारा आणि वाहन चालक गंभीर जखमी झाले होते. तर संजय तेरवडीया यांच्यासह त्यांची पत्नी प्रतिभा व मुलगी रेश्मा मुलीला उपचारासाठी पुणे येथील ससून रुग्णालयात हलविले असून त्याठिकाणी उपचार आहेत. सुरु य बुधवारी रात्रीच्या सुमारास संजय तेरवडीया यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्याने त्यांना खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. येथे त्यांच्यावर उपचार सुरु असतांना त्यांची प्राणज्योत मालवली. त्यानंतर गुरुवारी त्यांचे अंत्यसंस्कार पार पडले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे