यावल : प्रतिनिधी
शहरातील एका दुकानावर ५०० ची बनावट नोट चलनात आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या तीन जणांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून ९७ हजारांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. ही घटना बुधवारी सायंकाळी उघडकीस आली.
मिळालेल्या माहितीनुसार, श्रावण गंभीर महाजन (रा. रेंभोटा, ता. रावेर), राजेंद्र मुरलीधर पाटील (रा. अयोध्यानगर, जळगाव), नीलेश सुरेश पाटील (रा. डोणगाव, ता. धरणगाव) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे असून त्यांचा चौथा साथीदार फरार आहे. बुधवारी सायंकाळी भुसावळ रोडवरील एका दुकानावर चार जणा आले होते. त्यांनी येथे ५०० ची नोट दिली असता दुकान चालकाला संशया आला. त्याने पोलिसांना माहिती दिली.
काही क्षणातच पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांना पाहताच संशयितांनी तेथून पळ काढला. पोलिसांनी पाठलाग करून तीन जणांना पकडले. त्यांच्याकडून ९७ हजार रुपयांच्या बनावट नोटा जप्त केल्या. याप्रकरणी यावल पोलिसा ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला तर एक फरार संशयिताचा शोध घेण्यासाठी पोलिसांचे पथक मध्य प्रदेशकडे रवाना झाले आहे