• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या हस्ते शिवसेनेचा वचननामा प्रकाशित

जळगाव ग्रामीणसाठी सर्वांगीण विकासाचा गुलाबराव पाटील यांचा दृढ संकल्प !

editor desk by editor desk
November 14, 2024
in जळगाव, राज्य
0
मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या हस्ते शिवसेनेचा वचननामा प्रकाशित

जळगाव / धरणगाव 13 – शिवसेना नेते व महायुतीचे उमेदवार गुलाबराव पाटील यांनी आपल्या जळगाव ग्रामीण मतदारसंघासाठी आगामी पाच वर्षांसाठी एक ठोस आणि स्वतंत्र विकासाचा वचननामा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्रकाशित केला आहे. या वचननाम्यात मागील वेळेस दिलेल्या वचनांपेक्षा अधिक कार्य केले असून याही वेळेस मोठे प्रकल्पांवर भर देवून शेती रस्त्यांचे डांबरीकरण करण्याची कटिबद्धता आणि समाजातील प्रत्येक घटकाच्या सर्वांगीण विकासाचा संकल्प मांडण्यात आला आहे. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुलाबराव पाटील यांच्या विकासासाठी घेतलेल्या संकल्पाचे कौतुक केले आणि त्यांच्या नेतृत्वाखाली जळगाव ग्रामीणचा सर्वांगीण विकास होईल, असा विश्वास व्यक्त केला. तर गुलाबराव पाटील यांनी सांगितले की “धनुष्यबाणावर विश्वास दाखवून संधी द्या. हा वचननामा फक्त आश्वासन नाही, तर विकासाचा दृढ संकल्प असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

शेतकऱ्यांच्या हितासाठी विशेष योजना आखण्यात आली असून शेती रस्त्यांचे डांबरीकरण, सौर ऊर्जा प्रकल्पाला गती देऊन त्यांना आधुनिक सुविधा पुरविण्यासाठी शेतीसाठी सलग वीजपुरवठा, , गरजू शेतकऱ्यांसाठी ट्रान्सफॉर्मर योजना चालूच ठेवून महिला सशक्तीकरणाला विशेष प्राधान्य देत बचत गट भवन उभारणी, महिला बचत गटांना बाजारपेठ उपलब्ध करून देणे आणि स्वसंरक्षण प्रशिक्षण शिबिरांचे आयोजन यासारख्या योजना राबवल्या जाणार आहेत. युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी टेक्स्टाईल पार्क, सहकारी सूत गिरणी, आणि विविध प्रक्रिया उद्योगांना प्रोत्साहन, शिक्षण क्षेत्रात डिजिटल शाळांचे रुपांतर आणि स्पर्धा परीक्षा केंद्रांची स्थापना करून विद्यार्थ्यांना आधुनिक सुविधा पुरविण्याचा संकल्प वचननाम्यात करण्यात आला आहे.

प्रमुख विकास प्रकल्प
शेती रस्ते डांबरीकरणाला प्राध्यान्य, आसोदा – भादली परिसरात यशस्वी झालेली बंदिस्त पाईपलाईन योजना धरणगाव तालूक्यातही राबविणार, सुरु असलेल्या बालकवी ठोंबरे आणि बहिणाबाई चौधरी यांच्या स्मारकांना गती, धरणगाव रिंगरोड आणि पाळधी उड्डाणपूल, सर्व सुविधायुक्त बसस्थानकांची निर्मिती, मोठ्या पाझर तलाव निर्मिती आणि सिंचन प्रकल्पांचा विकास व शिरसोली परिसरात सौर ऊर्जा प्रकल्प व सुतगिरणीचाही समावेश आहे. बचत गट भवन उभारणी, उर्वरित ग्रामपंचायत कार्यालय इमारती, धरणगाव येथे बाळासाहेब ठाकरे उद्यानचा समावेश आहे.

Previous Post

लाडक्या भाचींचा हट्ट पुरविताना राजूमामांची दमछाक, प्रचारात घेतला वेग

Next Post

मागील चुक सुधारून जनसेवेसाठी सदैव तत्पर असणाऱ्या रोहिणी खडसे यांना बहुमताने विजयी करा – जाफर शेख

Next Post
मागील चुक सुधारून जनसेवेसाठी सदैव तत्पर असणाऱ्या रोहिणी खडसे यांना बहुमताने विजयी करा – जाफर शेख

मागील चुक सुधारून जनसेवेसाठी सदैव तत्पर असणाऱ्या रोहिणी खडसे यांना बहुमताने विजयी करा - जाफर शेख

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आज जळगाव जिल्हा दौरा : विविध विकासकामांचे भूमिपूजन व उद्घाटन
Uncategorized

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आज जळगाव जिल्हा दौरा : विविध विकासकामांचे भूमिपूजन व उद्घाटन

June 20, 2025
या राशीतील व्यक्तीची व्यवसायात प्रगती होणार !
राशीभविष्य

प्रशासकीय क्षेत्रात पदोन्नती मिळण्याची शक्यता

June 20, 2025
भुसावळातील चोरीची झाली उकल :  १८ लाखांचा मुद्देमाल जप्त !
क्राईम

भुसावळातील चोरीची झाली उकल :  १८ लाखांचा मुद्देमाल जप्त !

June 19, 2025
संजय राऊतांनी मातोश्रीचं बंगाली बाबा कनेक्शन काय ते पण सांगावं ; मंत्री शिरसाठ !
राजकारण

संजय राऊतांनी मातोश्रीचं बंगाली बाबा कनेक्शन काय ते पण सांगावं ; मंत्री शिरसाठ !

June 19, 2025
लाडक्या बहिणींसाठी सरकारने दिली खुशखबर !
क्राईम

लाडक्या बहिणींसाठी सरकारने दिली खुशखबर !

June 19, 2025
येत्या चार दिवसात राज्यात पावसाचा जोर वाढणार !
राजकारण

येत्या चार दिवसात राज्यात पावसाचा जोर वाढणार !

June 19, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group