Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » जळगाव ग्रामीणचा सर्वांगिण विकास हाच गुलाबराव देवकरांचा ध्यास
    राजकारण

    जळगाव ग्रामीणचा सर्वांगिण विकास हाच गुलाबराव देवकरांचा ध्यास

    editor deskBy editor deskNovember 12, 2024No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : जळगाव ग्रामीण मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार गुलाबराव देवकर यांच्या भादली-कडगाव-शेळगाव परिसरातील प्रचार रॅलीचे ठिकठिकाणी उत्स्फूर्त स्वागत झाले. याप्रसंगी त्यांनी ग्रामीण भागातील जनतेशी संवाद साधून त्यांचे प्रश्न जाणून घेतले. जळगाव ग्रामीणच्या सर्वांगिण विकासासाठी आपण सदैव कटिबद्ध असल्याची ग्वाही सुद्धा दिली.

    गुलाबराव देवकर यांनी भादली, शेळगाव, कडगाव, सुजदे, देऊळवाडे, भोलाणे, कानसवाडे आदी गावांना प्रचार रॅलीच्या माध्यमातून भेटी दिल्या. महिला, शेतकरी व बेरोजगारांच्या कल्याणासाठी महाविकास आघाडीने सादर केलेल्या जाहीरनाम्यातील पंचसूत्रीची माहिती दिली. यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, उपजिल्हाप्रमुख प्रा.भाऊसाहेब सोनवणे, जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती लक्ष्मण पाटील, संचालक दिलीप पाटील, योगराज सपकाळे, गोकूळ चव्हाण, डॉ.अरूण पाटील, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष बापू परदेशी, युवक तालुकाध्यक्ष विनायक चव्हाण, पं.स.चे माजी उपसभापती विजय नारखेडे, भादलीचे सरपंच मनोज चौधरी, शेळगावचे माजी सरपंच हरीष कोळी, रामा कोळी, निवृत्ती कोळी, कानसवाडे येथील सरपंच संजय कोळी, माजी उपसरंपच सुकदेव कोळी, भोलाणेचे सरपंच नितीन सपकाळे, कडगाव येथील मुरलीधर कोळी, पंढरीनाथ कोळी यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

    शेळगाव बॅरेजचे पाणी शेतीशिवारात खेळविणार

    जळगावहून शेळगावमार्गे यावल जाण्यासाठी दोन्ही बाजुने राज्यमार्ग तयार करण्यात आला आहे. मात्र, तापी नदीच्या पात्रात शेळगाव बॅरेजच्या खाली दोन तालुक्यांना जोडणाऱ्या पुलाचे काम खूपच संथगतीने सुरू आहे. सेवेची संधी मिळाल्यानंतर सदर पुलाचे काम प्राधान्याने पूर्ण करण्यात येईल. तसेच शेळगाव बॅरेजचे पाणी जळगाव तालुक्यातील शेतीशिवारात खेळविण्यासाठी प्रामुख्याने प्रयत्न केले जातील. जेणेकरून कोरडवाहू शेतकऱ्यांची शेती ओलिताखाली येऊन त्यांचे जीवनमान सुधारेल, असे प्रतिपादन माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनी केले

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    सरपंच परिषदेच्या लढ्याला यश; ६ महिन्यांची प्रशासक म्हणून मुदतवाढ जाहीर

    February 21, 2026

    राजकीय वाद न्यायालयात; राहुल गांधींना पुन्हा जामीन

    February 21, 2026

    “मोठ्या लोकांचा पाठिंबा असल्यानेच धाडस?” : रोहित पवारांचा सवाल

    February 21, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.