जळगाव : प्रतिनिधी
चोरवड येथे मध्य प्रदेश सीमातपासणी नाक्यावर राज्य विधानसभा निवडणुकीसाठी तैनात करण्यात आलेल्या सर्वेक्षण पथकाने ब-हाणपूरहून फैजपूरकडे आणला जात असलेल्या १४ लाख २१ हजार रुपये किमतीचा गुटखा जप्त केला आहे, तसेच सोबत मालवाहू वाहनही जप्त केले आहे. ही कारवाई दि. ६ रोजी मध्यरात्रीनंतर करण्यात आली.
सहायक पोलिस निरीक्षक अंकुश जाधव यांच्या नेतृत्वाखाली पो. कॉ. विशाल पाटील, पो.कॉ. रवींद्र भांबरे यांच्या पथकाने ही कारवाई केली. रात्री १:५० वाजेच्या सुमारास बऱ्हाणपूरकडून फैजपूरकडे जात असलेल्या छोट्या मालवाहू चारचाकी (क्र. एम.एच. ०४ एच.वाय. ६५१५) वाहनाला अडवून त्याची झडती घेतली. त्यातील आरोपी रिजवान शेख रऊफ (वय २८) व त्याचे सोबत असलेल्या शेख अयुब शेख शरीफ (वय २७, दोन्ही रा. छत्री चौक पठाणवाडी, फैजपूर, ता. यावल) हे राज्यात बंदी असलेला गुटखा आणत होते. या आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे



