जळगाव : प्रतिनिधी
वरणगाव येथील ऑर्डनन्स फॅक्टरीतील पाच रायफल चोरीच्या घटनेतील तिघांना भुसावळ न्यायालयाने पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. लीलाधर ऊर्फ नीलेश बळीराम थाटे यांच्यासह निखिल कडू थाटे आणि तुषार विश्वनाथ पाटील अशी तिघांची नावे आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, वरणगाव आयुध निर्माणीमध्ये तयार होणाऱ्या काडतूसांच्या चाचणीसाठी वापरल्या जाणाऱ्या तीन एके-४७ व दोन ५.५६ अशा पाच रायफलींची दि. २१ रोजी उघडकीस आली होती.
या गुन्ह्याचा तपास सुरू असताना २८ ऑक्टोबर रोजी सकाळी दोन एके ४७ रायफल आणि एक अन्य रायफलबेवारस अवस्थेत जाडगाव रेल्वे रुळावर आढळून आल्या होत्या. दरम्यान संशयित आरोपी लीलाधार थाटे यास ४ नोव्हेंबर रोजी एटीएस पथकाने उर्वरित दोन रायफलसह ताब्यात घेतले होते. त्यास पोलिस स्टेशनला हजर केले असता त्याने या गुन्ह्यात त्याच्या सोबत निखिल कडू थाटे आणि तुषार विश्वनाथ पाटील यांचा सहभाग असल्याचे कबूल केले. त्यामुळे त्यांना देखील अटक करण्यात आली. तिघांना भुसावळ न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्यांना पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. पुढील तपास श्रावण जवरे, पोकों मनोहर बनसोडे करीत आहेत.