Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » गुलाबराव पाटील यांच्या प्रचार रॅलीचा थरार : धनुष्यबाण आणि भगवे झेंडे सजवलेल्या कट-आउटसह भव्य मिरवणूक
    राजकारण

    गुलाबराव पाटील यांच्या प्रचार रॅलीचा थरार : धनुष्यबाण आणि भगवे झेंडे सजवलेल्या कट-आउटसह भव्य मिरवणूक

    editor deskBy editor deskOctober 29, 2024No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी

    शिवसेनेचे नेते व मंत्री, महायुतीचे उमेदवार गुलाबराव पाटील यांनी उमेदवारी दाखल केल्यासून प्रचाराचा धूनधडाका लावला आहे. भोकर – कानळदा जि. प. गटातील आव्हाणे, खेडी , वडनगरी, फुपनगरी, कानळदा कुवारखेडे व नांद्रा बु या गावांमध्ये आज प्रचार संपन्न झाला. या भागातील गावा – गावांमधील मतदार हे स्वयंस्फुर्तीने गुलाबराव पाटील यांना रॅलीमध्ये भेटत असून भक्कम पाठींबा दर्शवित आहे. गुलाबराव पाटील यांच्या भव्य अश्या प्रचार रॅलीत धनुष्यबाण आणि भगवे झेंडे सजवलेल्या कट-आउटसह भव्य मिरवणूक निघत आहे. त्यांच्या सोबत भाजपाचे जिल्हाध्यक्ष ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज जळकेकर महाराज, सेनेचे जिल्हा प्रमुख निलेश पाटील, रॉ. काँ. चे जिल्हाध्यक्ष संजय पवार यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी ‘धनुष्यबाणाचा’ झंझावाती प्रचार करीत आहे.

    शिवसेना नेते व मंत्री गुलाबराव पाटील यांच्या प्रचार रॅलीने कानळदा, आव्हाने, फूपनगरी, वडनगरी, आणि नांद्रा या गावांमध्ये जल्लोषाचे वातावरण होते. रॅलीत विविध ठिकाणी धनुष्यबाणाच्या प्रतीकांसह मोठे कट-आउट आणि गुलाबराव पाटील यांच्या भव्य फोटोंचे कट-आउट. याशिवाय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि इतर महत्त्वाच्या नेत्यांचेही कट-आउट रॅलीत ठिकठिकाणी बघायला मिळाले. प्रत्येक गावात औक्षण, फटाक्यांच्या धूमधडाक्यात व ढोल-ताशांच्या गजरातगुलाबराव पाटील यांच्यावर पुष्पीवृष्टी करून प्रचाराची मोठ्या उत्साहात सुरुवात झाली.

    प्रत्येक गावातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याने प्रचाराला एक वेगळीच ऊर्जा प्राप्त होत आहे. यावेळी गुलाबराव पाटील यांनी गावागावांमध्ये ठिकठिकाणी बैठका घेतल्या, ज्यात त्यांनी लोकांशी थेट संवाद साधून त्यांची जनसंपर्क मोहीम इतर राजकीय नेत्यांच्या तुलनेत वेगळी ठरत आहे.

    यांची होती प्रमुख उपस्थिती
    यावेळी, जिल्हाप्रमुख निलेश पाटील, उप जिल्हाप्रमुख अनिल भोळे, तालुका प्रमुख शिवराज पाटील, माजी सभापती राजेंद्र चव्हाण, जनाआप्पा कोळी, भाजपाचे तालुकाध्यक्ष हर्षल चौधरी, संजय भोळे, गोपाळ भंगाळे, संजय पाटील, सरपंच भगवान पाटील, शेतकी संघाचे विजय पाटील, मा. जि. प. सदस्य विलास सोनवणे, पवन सोनवणे, डॉ. कमलाकर पाटील, गोपालजीभाऊ, मच्छिंद्र पाटील, मुरलीधर अण्णा पाटील, विजू सपकाळे, दिलीप आगीवाल, निलेश वाघ, जितू अत्रे, श्यामकांत जाधव, वसंतराव भालेराव, अशोक सपकाळे, मनोहर पाटील, संदीप पाटील, सुरेश शामराव, , अशोक पाटील, दगडू चौधरी, रमेशआप्पा पाटील, दिलीप जगताप, बळीराम पाटील, विलास सोनवणे, राजू पाटील, राजू सोनवणे, यांच्यासह कानळदा – भोकर जिल्हा परिषद गटातील सरपंच उपसरपंच सदस्य पदाधिकारी, राष्ट्रवादी, भाजपा व शिवसेना – रीपाई महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    निवडणूक जिंकण्यासाठी राज्याचे वाटोळे; काँग्रेस नेत्यांचा हल्लाबोल

    January 31, 2026

    सुनेत्रा पवारांच्या निर्णयावर शरद पवार असमाधानी; ‘इतकी घाई का?’

    January 31, 2026

    धरणगाव तालुक्यात वादळ-पावसाचा कहर; रब्बी पिके भुईसपाट

    January 31, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.