• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

भाजप व शिंदे सेनेचा वाद : भाजपच्या पाच जागा पाडू ; शिंदे सेनेचा इशारा !

editor desk by editor desk
October 25, 2024
in राजकारण, राज्य, राष्ट्रीय
0
भाजप व शिंदे सेनेचा वाद : भाजपच्या पाच जागा पाडू ; शिंदे सेनेचा इशारा !

सोलापूर वृत्तसंस्था

राज्यात विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरु असून महायुती व महाविकास आघाडीच्या याद्या देखील जाहीर झाल्या आहे. त्यामुळे आता सर्वच उमेदवार अर्ज करण्याच्या धावपळीत असतांना एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. राज्यातील सोलापूरमध्ये भाजप आणि शिंदेसेनेतील अंतर्गत वाद आता चव्हाट्यावर येताय. महायुतीच्या जागा वाटपात शहर मध्य विधानसभेची जागा शिंदेसेनेला मिळायला हवी. अन्यथा भाजपच्या जिल्ह्यातील पाच जागा पाडू, असा इशारा शिंदेसेनेचे जिल्हाप्रमुख अमोल शिंदे व अन्य पदाधिकाऱ्यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे धोरण अडचणीत येईल, असे आम्ही काही करणार नाही, अशी भूमिका दुसरे जिल्हाप्रमुख मनिष काळजे यांनी जाहीर केले. शिंदे म्हणाले. सोलापर लोकसभा मतदारसंघातील एक जागा शिवसैनिकांची आहे. भाजपचे नेते येथून देवेंद्र कोठे यांना उमेदवारी देण्याची तयारी असल्याचे समजते. या उमेदवारीला आमचा जाहीर विरोध आहे. त्यांच्या घरातील एक माणूस पवार गटाकडून लढतो तर दुसरा भाजपकडून हे असले राजकारण सर्वांना समजते.

शिवसैनिकांकडून शहर उत्तर, शहर मध् सोलापूर दक्षिण, मोहोळ आणि पंढरपूर मतदारसंघात उमेदवार देण्यात येईल. उमेदवार भाजपाला पाडण्यासाठी असतील. यावेळी शहर प्रमुख मनोज शेजवाल, उमेश गायकवाड, हरिभाऊ चौगुले, तुकाराम मस्टे, सागर शितोळे आदी उपस्थित होते.

जिल्हाप्रमुख मनीष काळजे म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शहर मध्यची जागा शिंदेसेनेकडे घेतील याचा विश्वास आहे. पण यात काही बदल झाला तर आम्ही त्यांच्या आदेशाची वाट बघू. एकनाथ शिंदे यांचे धोरण अडचणीत येईल, असे आम्ही काही करणार नाही.
भाजप कार्यालयातही बैठक भाजपच्या शहर कार्यालयात शहराध्यक्ष नरेंद्र काळे यांच्या उपस्थितीत गुरुवारी दुपारी बैठक झाली. पक्षाकडून पाच जणांनी उमेदवारी मागितली आहे. यापैकी एकाला उमेदवारी द्यावी. इतरांना देऊ नये, असे पत्र पांडुरंग दिड्डी, अनंत जाधव, श्रीनिवास संगा, अंबादास गोरंट्याल यांनी काळे यांना दिली.

Previous Post

तरुणाने विष प्राशन करुन संपविले आयुष्य !

Next Post

भाजपला धक्का : माजी खासदाराने हाती घेतली घड्याळ !

Next Post
भाजपला धक्का : माजी खासदाराने हाती घेतली घड्याळ !

भाजपला धक्का : माजी खासदाराने हाती घेतली घड्याळ !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

धरणगाव चोपडा रस्त्याचा मस्तवाल ठेकेदाराची शेतकऱ्यांवर दादागिरी
क्राईम

धरणगाव चोपडा रस्त्याचा मस्तवाल ठेकेदाराची शेतकऱ्यांवर दादागिरी

July 3, 2025
दिशा सालियन मृत्यूप्रकरणी आदित्य ठाकरेंना क्लीन चिट !
क्राईम

दिशा सालियन मृत्यूप्रकरणी आदित्य ठाकरेंना क्लीन चिट !

July 3, 2025
वेगवेगळ्या ठिकाणी दोन मुलीवर अत्याचार ; आरोपींना घेतले ताब्यात !
क्राईम

बीड पुन्हा हादरले : नराधमाने केला गतिमंद मुलीवर बलात्कार !

July 3, 2025
मनसे कार्यकर्त्यांकडून मारहाण :  राज ठाकरेंना हात जोडून विनंती !
राजकारण

मनसे कार्यकर्त्यांकडून मारहाण : राज ठाकरेंना हात जोडून विनंती !

July 3, 2025
राज्यातील अनेक ठिकाणी हवामान विभागाचा यलो अलर्ट जारी !
राजकारण

राज्यातील अनेक ठिकाणी हवामान विभागाचा यलो अलर्ट जारी !

July 3, 2025
 फुलगाव फाट्याजवळ गावठी कट्टा बाळगणारा तरुण अटकेत !
क्राईम

 फुलगाव फाट्याजवळ गावठी कट्टा बाळगणारा तरुण अटकेत !

July 3, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group