जळगाव : प्रतिनिधी
खानदेशातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेले श्री क्षेत्र पद्मालय गणपती मंदिर च्या विकासासाठी तीर्थक्षेत्र विकास अंतर्गत कोट्यावधी रुपयांचा निधी राज्य शासनाने मंजूर केला यात 14 कोटी रुपयांच्या विकास कामांमध्ये ठेकेदाराला काम मिळून देण्यासाठी त्याच्याकडून तीन कोटी रुपये उकळले असल्याची चर्चा सुरू असून पारोळा येथील गद्दाराच्या मुलाने हा पराक्रम केला असल्याचे ठेकेदारांमध्ये व प्रशासनामध्ये चर्चा आहे.
समाजामध्ये देवस्थानच्या विकासा साठी लोक वर्गणीतून विकास केला जातो अनेक भाविक दानधर्म करीत असतात परंतु श्री क्षेत्र पद्मालय गणपती मंदिर येथे शासनाने तीर्थक्षेत्र विकास अंतर्गत कोट्यावधी रुपयांचा निधी दिला हे काम दर्जेदार व्हावे यासाठी प्रशासनाने पाठपुरावा केला परंतु टक्केवारीसाठी अनेक ठेकेदारांना झुलवत ठेवले शेवटी गद्दाराच्या मुलाने बाजार मांडला आणि तीन कोटी रुपये घेऊन हे काम मराठा समाजाच्या एका प्रतिष्ठित ठेकेदाराला दिले असल्याचे सांगण्यात आले.
विशेष म्हणजे टक्केवारीचा पारोळा एरंडोल तालुक्यात बाजार मांडला आहे. पैशांच्या जीवावर सर्व काही करू लोकांना विकत घेऊ महिलांना विकत घेऊ अशी भाषा गद्दाराच्या मुलाकडून वापरली जात आहे स्वाभिमानी जनतेने आता जागृत होण्याची वेळ आली आहे. एरंडोल तालुक्यातील अनेक नामवंत पुढाऱ्यांना संपविण्याचा डाव देखील यशस्वी झाला आहे अनेकांच्या खांद्यावर बंदूक ठेवून स्वार्थी राजकारण केले जात आहे. टक्केवारी व दहशतीमुळे हे तालुके चर्चेत आलेले आहेत. असे अनेक किस्से या गद्दाराच्या मुलाचे बाहेर येत असून लोकांच्या मनात चीड निर्माण व्हायला लागली आहे.