जळगाव : प्रतिनिधी
जळगाव तालुका पोलीस ठाण्यात दुचाकी चोरीच्या गुन्ह्यात ५ वर्षांपासून फरार असलेल्या संशयित आरोपीला एमआयडीसी पोलीसांनी गुरूवारी १७ ऑक्टोबर रोजी दुपारी ४ वाजता कठोरा गावातून अटक केली आहे. त्यांच्याकडून चोरीच्या दोन दुचाकी हस्तगत करण्यात आले आहे. जिवन गोकुळ शिंदे रा. कठोरा ता.जळगाव असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. त्याला पुढील कारवाईसाठी जळगाव तालुका पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव तालुक्यातील आव्हाणे शिवारातुन प्रशान सानप रा. शनीपेठ यांची दुचाकी सन २०१८ मध्ये चोरून नेली होती. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यात संशयित आरोपी फरार होता. दरम्यान, संशयित आरोपी जीवन शिंदे हा चोरीच्या दोन दुचाकी घेवून फिरत असल्याची गोपनिय माहिती एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांना मिळाली. त्यानुसार पथकाने गुरूवारी १७ ऑक्टोबर रोजी दुपारी ४ वाजता कठोरा गावात जावून कारवाई करत जीवन शिंदे याला अटक केली. त्यांच्याकडून चोरीच्या दुचाकी क्रमांक (एमएच १९ बीई ६२३०) आणि (एमएच १२ जीएच ८९७) हे जप्त केल्या आहेत. यातील एक दुचाकी पुण्यातील चोरीची असल्याचे समोर आले आहे. पुढील कारवाईसाठी संशयित आरोपीला जळगाव तालुका पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दिपक जगदाळे, पोहेकॉ गणेश शिरसाळे, जमीर शेख, किशोर पाटील, पो.कॉ.नाना तायडे, गणेश ठाकरे, नितीन ठाकरे, किरण पाटील, विकास सातदिवे, योगेश बारी हे करीत आहे.