• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

खूनाच्या गुन्ह्यातील बंद्याला कारागृह पोलिसांकडून बेदम मारहाण

editor desk by editor desk
October 18, 2024
in क्राईम, जळगाव
0
शिक्षण घेवून घरी येणाऱ्या तरुणाला लुटले !

जळगाव : प्रतिनिधी

कारागृहात आम्ही तुम्हाला प्रोटेक्शन देतो त्या मोबादल्यात पैसे द्या असे म्हणत खूनाच्या गुन्ह्यात संशयीत असलेल्या ज्ञानेश्वर अभिमान पाटील (वय ५५, रा. वाघळी, ता. चाळीसगाव) या बंद्याला कारागृह पोलिसांनी बेदम मारहाण केली. ही घटना मंगळवारी जिल्हा कारागृहात घडली होती, मात्र त्या बंद्याला मारहाणीमुळे रक्ताची लघवी होवून श्वास घेण्यास त्रास होत असल्याने त्याला गुरुवारी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तसेच मारहाणीची वाच्यता केल्यास जीवेठार मारण्याची धमकी दिल्याचा आरोप बंदीचा मुलगा राहुल पाटील याने केला.

मिळालेल्या माहितीनुसार, चाळीसगाव तालुक्यातील वाघळी येथील ज्ञानेश्वर पाटील हे खूनाच्या गुनह्यात गेल्या आठ महिन्यांपासून जिल्हा कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहेत. कारागृहातील ९ नंबरच्या बॅरेकमध्ये त्यांना ठेवण्यात आले आहे. दरम्यान, कारागृहातील हिवरकर नामक कर्मचारी हा ज्ञानेश्वर पाटील यांना आम्ही तुम्हाला जेलमध्ये प्रोटेक्शन देतो, त्या मोबदल्यात आम्हाला पैसे द्या असे म्हणत तो पैशांची मागणी करीत होता. मात्र ज्ञानेश्वर पाटील यांनी त्याला पैसे देण्यास नकार दिल्याने मंगळवार दि. १५ रोजी दुपारी साडेबारा ते दीड वाजेच्या सुमारास हिवकर नामक कर्मचाऱ्याने त्यांना बॅरेकमधून बाहेर काढत तुम्हाला साहेबांनी बोलवले असल्याचे सांगून तो त्यांना घेवून गेला.

मारहाणीत ज्ञानेश्वर पाटील हे गंभीर जखमी होवून त्यांच्या पाठीवर मारहाणीच्या खुणा दिसून येत होत्या. दरम्यान, गुरुवारी दुपारच्या सुमारास गंभीर जखमी झालेले ज्ञानेश्वर पाटील यांना अचानक श्वास घेण्याचा त्रास जाणवू लागला, तसेच त्यांना रक्ताची देखील लघवी झाल्यानंतर त्यांना कारागृह कर्मचाऱ्यांनी जिल्हा रुग्णालयात दाखल केले.

Previous Post

भुसावळ अमृतच्या कामामुळे आमदार संजय सावकारे यांच्यावर जनतेचा रोष

Next Post

शिरसोली परिसरात गावठी हातभट्टीची दारु आणि कच्चे रसायन केले नष्ट

Next Post
शिरसोली परिसरात गावठी हातभट्टीची दारु आणि कच्चे रसायन केले नष्ट

शिरसोली परिसरात गावठी हातभट्टीची दारु आणि कच्चे रसायन केले नष्ट

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

औष्णिक विद्युत केंद्रात कंत्राटी कामगाराचा मृत्यू !
क्राईम

औष्णिक विद्युत केंद्रात कंत्राटी कामगाराचा मृत्यू !

June 28, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

दोन दुचाकींचा भीषण अपघात : चार जण जखमी !

June 28, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

 जळगावात वेगवेगळ्या ठिकाणच्या अपघातांत तीन जण जखमी

June 28, 2025
धरणगाव तालुक्यातील शेतकऱ्याचा मका जळून खाक !
क्राईम

धरणगावात ७३ वर्षांच्या आजीवर नातवानेच केला हल्ला !

June 28, 2025
बडोदा येथे दुचाकीचा अपघात : जिल्ह्यातील दाम्पत्य ठार !
क्राईम

बडोदा येथे दुचाकीचा अपघात : जिल्ह्यातील दाम्पत्य ठार !

June 28, 2025
या राशीतील व्यक्तींना अहंकार सोडवा लागणार !
राशीभविष्य

नवीन मित्रांसह तुम्ही संगीत, मनोरंजन इत्यादींचा आनंद घ्याल.

June 28, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group