• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

जळगाव कारागृहातून बाहेर पडताच पोलिसांनी ठोकल्या बेड्या !

editor desk by editor desk
October 17, 2024
in क्राईम, जळगाव
0
जळगाव कारागृहातून बाहेर पडताच पोलिसांनी ठोकल्या बेड्या !

जळगाव : प्रतिनिधी

अनेक गंभीर गुन्हे दाखल असलेल्या योगेश उर्फ रितीक दिगंबर कोल्हे (वय ३७, रा. असोदा, ता. जळगाव) हा एका गुन्ह्यात जिल्हा कारागृहात होता. दरम्यान, त्याच्यावर एमपीडीअंतर्गत देखील कारवाई करण्यात आली होती. कारागृहातून बाहेर पडताच नशिराबाद पोलिसांनी त्याला बेड्या ठोकत त्याला नागपूर कारागृहात स्थानबद्ध केले.

मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव तालुक्यातील असोदा येथील योगेश उर्फ रितीक कोल्हे याच्यावर विविध पोलिस ठाण्यात गंभीर गुन्हे दाखल असून त्याच्यावर अनेकदा प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली होती. तरी देखील त्याच्या वर्तवणुकीत सुधारणा होत नसल्याने नशिराबाद पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक ए.सी. मनोरे यांनी त्याच्या स्थानबद्धतेचा प्रस्ताव जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्यामार्फत जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्याकडे पाठविला होता. त्यानुसार त्याच्या स्थानबद्धतेचे आदेश देण्यात आले होते. परंतु तालुका पोलिस ठाण्यात दाखल एका गुन्ह्यात योगेश हा जिल्हा कारागृहात होता.

पोलिसांच्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार योगेश उर्फ रितीक कोल्हे याचा जामीन मंजूर झाल्याची माहिती नशिराबाद पोलिसांना मिळताच पोउनि गणेश देशमुख, सहायक फौजदार संजय महाजन, पोहेकॉ शरद भालेराव, गिरीश शिंदे, सागर बिडे यांनी त्याला दि.१५ ऑक्टोबर रोजी तो कारागृहातून बाहेर पडताच त्याला ताब्यात घेतले. त्यानंतर त्याला नागपूर कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले.

Previous Post

अध्यात्मिक उन्नतीसाठी शिवमहापुराण कथा लाभदायी : आ. राजूमामा भोळे

Next Post

कुलूप तोडून चोरट्यांनी रोकडवर मारला डल्ला

Next Post
घर फोडीकरीत लाख रुपयांचे सोने चांदीचे दागिने आणि रोकड लंपास

कुलूप तोडून चोरट्यांनी रोकडवर मारला डल्ला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

भरधाव चारचाकीचा भीषण अपघातात तीन ठार तर दोन गंभीर !

June 27, 2025
राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !
राजकारण

राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !

June 27, 2025
धरणगाव तालुक्यातील शेतकऱ्याचा मका जळून खाक !
क्राईम

धरणगावात खळबळ : ७३ वर्षीय वृद्ध महिलेच्या घरात घुसून अज्ञात हल्लेखोराने जीवघेणा हल्ला !

June 27, 2025
खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !
क्राईम

खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !

June 27, 2025
बोदवडात चोरी केल्याप्रकरणी महिलेस दोन दिवस पोलीस कोठडी
क्राईम

पुण्याचे तरुण दरोड्याच्या तयारीत असतांना चोपड्यात अटक !

June 27, 2025
जळगावात दांडियात बुरखा घालून नृत्य
क्राईम

गुरांची वाहतूक करणारे वाहन पोलिसांनी केले जप्त !

June 27, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group