जळगाव – शहराला केंद्र व राज्य शासनाची अमृत पाणीपुरवठा योजनेचे कामाचे लोकार्पण मंगळवारी आचारसंहिता लागण्याच्या काही मिनिटा आधी महापालिकेने अचानक घाई गडवडीतून उरकावण्यात आल्याने या योजनेबाबत तसेच प्रशासनाच्या कारभाराबाबत अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
जळगाव शहराला नवीन जलवाहिनीतून पाणीपुरवठा करण्याची अमृत योजनेचे काम 2018 मध्ये शहरात सुरू झाले. दोन वर्षाचा कालावधी जाऊन सुद्धा गेली सहा वर्ष ही अमृत योजना पूर्ण न झाल्यामुळे महापालिका प्रशासन तसेच जैन इरिगेशन कंपनीने घेतलेल्या या कामावर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. तसेच महापालिकेच्या महासभांमध्येही अमृत योजनेच्या कामावरून खडाजंगी अनेक वेळा पहावयास मिळाली. त्यात अमृत योजनेचे घाईगडबडीत लोकार्पण कार्यक्रम आज खासदार स्मिता वाघ, भाजपचे काही मोजके पदाधिकारी तसेच महापालिकेच्या आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे व पदाधिकारी यांच्या उपस्थितीत करण्यात आला. आचार संहिता लग्नाच्या काही मिनिटात अगोदर कशासाठी लोकार्पण करण्यात आले याबाबत चर्चेला उधाण आले आहे. तर महापालिका प्रशासन व मक्तेदाराच्या कामावर देखील प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.