जळगाव : प्रतिनिधी
आजीच्या घरी झोपण्यासाठी गेलेला असताना योगेश संतोष पाटील (रा. शिवकॉलनी) याने चोरलेले सहा लाख दोन हजार १४० रुपयांचे सोने तो विकायला आला, मात्र पोलिसांच्या जाळ्यात अडकल्याने त्याचा हा डाव फसला. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्याला बळीराम पेठेतून अटक केली असून त्याच्याकडून सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले.
मिळालेल्या माहितीनुसार, स्थानिक गुन्हे शाखेचे पथक संशयिताचा शोध घेत असताना संशयित योगेश पाटील हा चोरलेले दागिने विक्रीसाठी बळीराम पेठ परिसरात फिरत असल्याची माहिती पथकाला मिळाली. त्यानुसार योगेशची झडती घेतली असता त्याच्याकडे चोरलेले दागिने सापडले. त्याची कसून चौकशी केल्यानंतर त्याने हे दागिने आजीच्या घरून चोरी केल्याची कबुली दिली. पथकाने दागिने जप्त करून संशयिताला शहर पोलिसांच्या ताब्यात दिले पढील तपास स.पो.नि. रामचंद शिखरे करीत आहेत.
ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली पो.उ.नि. गणेश वाघमारे, दत्तात्रय पोटे, सहायक फौजदार अतुल वंजारी, संजय हिवरकर, हरिलाल पाटील, विजय पाटील, रवी नरवाडे, राजेश मेढे, प्रदीप सपकाळे यांनी केली