Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » अजिंठा चौकात भीषण अपघात : महिला जागीच ठार
    क्राईम

    अजिंठा चौकात भीषण अपघात : महिला जागीच ठार

    editor deskBy editor deskOctober 10, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी

    शहरातून गेलेल्या महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच असून, बुधवारी पहाटे ३ वाजता अजिंठा चौकात अज्ञात वाहनाने एका दाम्पत्याच्या दुचाकीला दिलेल्या धडकेत ५२ वर्षीय महिलेचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात महिलेच्या पतीला जबर दुखापत झाली आहे. याप्रकरणी अज्ञात वाहनचालकाविरुद्ध एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, अनिता सुनील राणे (वय ५२, रा. सद्‌गुरूनगर, जळगाव) असे मृत महिलेचे नाव आहे. अनिता राणे या बुधवारी पहाटे ३ वाजेच्या सुमारास पती सुनील बाबूराव राणे यांच्यासोबत सद्‌गुरूनगरातून दुचाकीने रिंगरोड भागात बांधकाम सुरू असलेल्या त्यांच्या घराकडे पाणी भरायला जात होत्या. ते अजिंठा चौकात आले असताना समोरून आलेल्या एका अज्ञात वाहनाने राणे दाम्पत्याच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत राणे दाम्पत्य दूर फेकले गेले. त्यात अनिता राणे यांचे डोके थेट धडापासून वेगळे झाले. त्यांचा जागेवरच मृत्यू झाला. तर पती सुनील राणे यांनाही मार लागला. पहाटेची वेळ असल्याने रस्त्यालगत कोणीही नव्हते. त्यामुळे दाम्पत्याला उडविणाऱ्या वाहनचालकाने घटनास्थळाहून पळ काढला. एका रिक्षाचालकाला अपघात झाल्याचे कळल्यानंतर याबाबत त्याने एमआयडीसी पोलिसांना कळविले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    खानापूरजवळील लुटीचा उलगडा; ६७ सीसीटीव्ही तपासून पोलिसांची धडाकेबाज कारवाई

    February 25, 2026

    भाजप-काँग्रेस वाद रंगला; तुषार दामगुडे-हनुमंत पवार मारहाणी प्रकरण उघडकीस

    February 25, 2026

    जमावाच्या संतापाचा कहर; बेदम मारहाणीत अनोळखी तरुणाचा अंत

    February 25, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.