पारोळा : प्रतिनिधी
जिल्ह्यातून हद्दपार झालेला इसम पारोळा शहरात बिनापरवानगी वावरत असताना जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पारोळा येथे अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हद्दपार केलेल्या आरोपींवर वेळोवेळी नजर ठेवण्यासाठी जिल्हा पोलिस अधीक्षकांनी खास पथक तयार केले आहे. सध्या सुरू असलेल्या नवरात्रोत्सवानिमित्त पेट्रोलिंग करीत असताना पारोळा येथील वंश ऊर्फ गणेश काशिनाथ नरवाडे (वय २०) हा पारोळा येथे वावरत असताना त्यास शिताफीने अटक करण्यात आली.
उपविभागीय दंडाधिकारी, एरंडोल यांच्या आदेशानुसार २८ नोव्हेंबर २०२३ रोजी एक वर्षासाठी जळगाव जिल्ह्यातून त्याला हद्दपार करण्यात आले आहे. उपविभागीय अधिकारी यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याने त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखा, जळगावचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक बबनराव आव्हाड, उपनिरीक्षक राहुल तायडे, हवालदार संदीप पाटील, प्रवीण मांडोळे, नंदलाल पाटील, भगवान पाटील, राहुल कोळी, विलास गायकवाड, राहुल बैसाणे यांनी केली आहे.