जळगाव : प्रतिनधी
सून व जेठाणीसह मंदिरातून दर्शन घेऊन परतत असताना कलाबाई लक्ष्मण सोनवणे (५३, रा. मोहाडी, ता. जळगाव) यांच्या गळ्यातील सोनपोत दोन जणांनी ओढून नेली. ही घटना सोमवारी (७ ऑक्टोबर) नागझिरी शिवारात नागाई जोगाई मंदिराजवळ घडली. याप्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, एकाला अटक करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कलाबाई सोनवणे या सून व जेठाणीसह नागाई जोगाई मंदिरात दर्शन घेऊन परतत असताना अमर ताराचंद मोरे (३२, रा. भातखंडा, ता. पाचोरा, ह.मु. श्यामनगर, जळगाव) व नीलेश अरूण सोनवणे (रा. भातखंडा, ता. पाचोरा) हे आले. अमरने महिलेच्या गळ्यातील सोनपोत ओढली व दोघांनी नदीपात्राकडे पळ काढला होता. मात्र महिलेने आरडाओरड केल्याने आजूबाजूच्या नागरिकांनी अमर मोरेला पकडले तर दुसरा पसार झाला.