जळगाव : प्रतिनिधी
घराकडे का पाहतो? असा जाब विचारल्याच्या कारणावरून गोपाल भगवान पाटील (४०, रा. देव्हारी, ता. जळगाव) यांच्यासह भांडण सोडविण्यासाठी आलेल्यास तीन जणांनी मारहाण करीत विळ्याने वार केला. ही घटना तालुक्यातील देव्हारी येथे शनिवारी (५ ऑक्टोबर) घडली. याप्रकरणी नशिराबाद पोलिस ठाण्यात तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गोपाल पाटील यांच्या घराकडे एक जण पाहत जात होता. त्याला याविषयी विचारणा केली असता या रागातून पाटील यांना तीन जणांनी शिवीगाळ करून विळ्याने वार करीत दुखापत केली. भांडण सोडविण्यासाठी कैलास भगवान पाटील हे तेथे आले असता त्यांच्यावरही वार करण्यात आला.