जळगाव : प्रतिनिधी
शहरातील रामानंद नगर पोलिस स्टेशन हद्दीतील एका डॉक्टरचे एका महिलेसोबत अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून या डॉक्टरला संबंधित महिलेच्या पतीसह चार जणांनी बेदम मारहाण केली. ही घटना ४ ऑक्टोबर रोजी रात्री घडली. या प्रकरणी रामानंद नगर पोलिस ठाण्यात चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मारहाण झालेल्या २९ वर्षीय डॉक्टरचे आपल्या पत्नीशी अनैतिक संबंध असल्याचा संशय एका जणाला आला. त्यातून त्याच्यासह अन्य तीन जणांनी शुक्रवारी (४ ऑक्टोबर) रात्री डॉक्टरच्या घराजवळ जाऊन त्यांना लोखंडी रॉड व फायटरने मारहाण केली. या प्रकरणी संबंधित डॉक्टरांनी रामानंद नगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून शनिवारी (५) ऑक्टोबर) मारहाण करणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोहेकों भूषण जैतकर करीत आहेत