Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » एलसीबीची मोठी कारवाई : बकऱ्यांची चोरी करणाऱ्या टोळीला घेतले ताब्यात !
    क्राईम

    एलसीबीची मोठी कारवाई : बकऱ्यांची चोरी करणाऱ्या टोळीला घेतले ताब्यात !

    editor deskBy editor deskOctober 5, 2024No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    चाळीसगाव : प्रतिनिधी

    तालुक्यातील हिंगोणे परिसरात धारदार शस्त्राचा धाक दाखवून १९ बोकड व ७ बकऱ्यांची चोरी करणाऱ्या टोळीचा जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पर्दाफाश केला असून त्यांच्याकडून १ लाख ३५ हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अशी माहिती जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांनी दिली आहे.
    मिळालेल्या माहितीनुसार, हिंगोणे गावातील एका झोपडीच्या ठिकाणी टोळीने धारदार शस्त्राचा धाक दाखवत १९ बोकड व ७ बकऱ्या चारचाकी वाहनात टाकून चोरी केल्याची घटना घडली होती. याबाबत चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान ही चोरी चाळीसगाव तालुक्यातील भवाळी गावातील चेतन गायकवाड यांनी केल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांना मिळाली.
    त्यानुसार त्यांनी पथकाला कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. पथकाने गुरुवारी ३ ऑक्टोबर रोजी भवाळी गावात जाऊन चेतन गायकवाड व त्यांचे साथीदार यांना ताब्यात घेऊन त्यांची विचारपूस केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. ही चोरी चेतन गायकवाड यांच्यासह त्याचे साथीदार गोरख फकीरा गायकवाड, बबलू आबा जाधव, गोरख सुरेश गोकुळ, सोमनाथ भिकन गायकवाड, गोकुळ गायकवाड आणि शंकर मोरे सर्व रा. भवानी ता. चाळीसगाव यांच्या सोबत केल्याचे सांगितले. यातील गोकुळ गायकवाड आणि शंकर मोरे हे दोघे पसार झाले. उर्वरित पाच जणांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली दुचाकी आणि रोकड असा एकूण १ लाख ३५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक गणेश वाघमारे, दत्तात्रय पोटे, पोलीस कॉन्स्टेबल संदीप पाटील, हिरालाल पाटील, मुरलीधर धनगर, प्रवीण भालेराव, महेश पाटील, सागर पाटील, ईश्वर पाटील, दीपक चौधरी यांनी केली आहे. अटकेतील पाचही जणांना पुढील चौकशीसाठी चाळीसगाव ग्रामीण पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे, अशी माहिती जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रका नुसार कळविले आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    सर्वांसमोर झालेला अपमान जीवावर बेतला; २० वर्षीय विद्यार्थ्याच्या मृत्यूने जळगाव हळहळले

    February 17, 2026

    शेतात पाणी भरण्यास निघालेल्या तरुणाचा भीषण अपघातात मृत्यू

    February 16, 2026

    दारूच्या नशेत वाद, तरुणाचा निर्घृण खून; अल्पवयीनसह दोघे ताब्यात

    February 16, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.