Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » दुचाकी चोरी वाढल्या : पोलिसांनी दोघांना घेतले ताब्यात !
    क्राईम

    दुचाकी चोरी वाढल्या : पोलिसांनी दोघांना घेतले ताब्यात !

    editor deskBy editor deskOctober 4, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी

    तालुक्यातील उमाळा बसस्थानकासमोरून दुचाकीसह दोन चोरट्यांना पोलीसांनी कारवाई करत अटक केली आहे. त्यांच्याकडून चोरीच्या एकुण ३ दुचाकी जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई एमआयडीसी पोलीसांनी गुरूवारी दुपारी केली आहे. अजून काही गुन्हे उघडकीला येण्याची शक्यता असून याबाबत चौकशीला सुरूवात करण्यात आली आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, जामनेर तालुक्यातील गाडेगाव येथील रहिवाशी भूषण झांबरे १९ सप्टेंबर रोजी कामाच्या निमित्ताने (एमएच १९ बीएल ९३३४) या दुचाकीवरून जळगावकडे येत असताना रस्त्यावरील उमाळा बसस्थानकाजवळ नास्ता करण्यासाठी थांबले. त्यावेळी अज्ञात चोरट्यांनी अवघ्या २० मिनिटात हे त्यांची दुचाकी चोरून नेली. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान कुसुंबा शिवारातील काही मुलांनी उमाळा गाव परिसरात अजून काही दोन दुचाकी चोरून पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांना माहिती मिळाली. या गुन्ह्याच्या शोध घ्यावा, अशा सूचना पोलीस निरीक्षक निकम यांनी दिल्या.

    पथकातील पोलीस उपनिरीक्षक दीपक जगदाळे, पोलीस कॉन्स्टेबल दत्तात्रय बडगुजर, गणेश शिरसाळे, किशोर पाटील, विकास सातदिवे, योगेश बारी, नितीन ठाकूर, नाना तायडे, किरण पाटील, गणेश ठाकरे, ललित नारखेडे यांनी कारवाई करत संशयित आरोपी पवन उर्फ भांजे गणेश पाटील वय-२२ आणि निखिल जयराम पाटील वय-२१ दोन्ही रा. इंदिरानगर, कुसुंबा या दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून चोरीच्या एकूण तीन दुचाकी हस्तगत करण्यात आले. पुढील तपास पोलीस नाईक विकास सातदिवे करीत आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    शासकीय व अनुदानित आश्रमशाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळाले पाहिजे

    March 4, 2026

    जिल्ह्यात अवैध गौणखनिज उत्खननाविरोधात महसूल विभागाची धडक कारवाई

    March 3, 2026

    मध्यपूर्वेत युद्धज्वाला; दुबई विमानतळ ठप्प, प्रवाशांचा थरारक अनुभव

    March 3, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.