• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

एलसीबीच्या कारवाई दुचाकीसह मोबाईल चोरणारे अटकेत !

editor desk by editor desk
October 2, 2024
in क्राईम, जळगाव
0
एलसीबीच्या कारवाई दुचाकीसह मोबाईल चोरणारे अटकेत !

जळगाव : प्रतिनिधी

जळगाव शहरातील वेगवेगळ्या भागातून दुचाकी आणि मोबाईल चोरून नेणाऱ्या दोन संशयित आरोपींना जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मंगळवारी १ ऑक्टोबर रोजी दुपारी ३ वाजता पिंप्राळा हुडको परिसरातून अटक केली आहे. याबाबत जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शोएब अफजल खान पठाण वय-२३ आणि शेख आवेश शेख मोहम्मद वय-२१ दोन्ही राहणार पिंप्राळा हुडको, जळगाव असे अटक केलेल्या दोन्ही संशयित आरोपींची नावे आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील कोर्ट चौक, सुभाष चौक, नेहरू चौक या ठिकाणाहून दुचाकी तर खोटे नगर भागातून मोबाईल असा मुद्देमाल चोरून नेल्याच्या घटना घडल्या होत्या. या संदर्भात संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आले होते. या चोरीच्या गुन्ह्यातील संशयित आरोपी शोएब पठाण आणि शेख आवेश शेख मोहम्मद हे दोन्ही चोरीच्या दुचाकीवरून पिंप्राळा हुडको भागात फिरत असल्याची गोपनीय माहिती जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी मंगळवार १ ऑक्टोबर रोजी दुपारी ३ वाजता पथकाला कारवाई करण्याच्या सूचना दिल्या.

त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय पोटे, सहायक फौजदार रवी नरवाडे, संजय हिवरकर, पोलीस कॉन्स्टेबल संघपाल तायडे, मुरलीधर धनगर, हरिलाल पाटील, पोलीस नाईक प्रवीण भालेराव यांच्यासह पथकाने कारवाई करत संशयित आरोपी शोएब अफजल खान पठाण वय-२३ आणि शेख आवेश शेख मोहम्मद वय-२१ दोन्ही राहणार पिंप्राळा हुडको, जळगाव या दोघांना अटक केली. त्यानंतरी चोरीच्या गुन्ह्याची कबुली दिली असून चोरीच्या दोन दुचाकी आणि मोबाईल जप्त करण्यात आला आहे. दोघांना शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल भास्कर ठाकरे करीत आहे.

Previous Post

नार पार प्रकल्पाच्या अगोदर गिरणेचे पाणी मन्याड धरणात व वरखेडे धरणाचे पाणी हिंगोणे पर्यंत आणून तालुका सुजलाम सुफलाम करणार – आ. मंगेश चव्हाण

Next Post

व्यवसायाशी संबंधित लोकांना नवीन करार मिळणार !

Next Post
जुन्या समस्येपासून या लोकांना आज मिळणार आराम !

व्यवसायाशी संबंधित लोकांना नवीन करार मिळणार !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

माजी उपनगराध्यक्ष महाजन हल्ला प्रकरणी : तीन संशयित अटकेत !
क्राईम

माजी उपनगराध्यक्ष महाजन हल्ला प्रकरणी : तीन संशयित अटकेत !

June 27, 2025
चोपडा

धरणगाव चोपडा रस्ता ठेकेदारासाठी पैसे कमवण्याचे एटीएम

June 27, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

भरधाव चारचाकीचा भीषण अपघातात तीन ठार तर दोन गंभीर !

June 27, 2025
राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !
राजकारण

राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !

June 27, 2025
धरणगाव तालुक्यातील शेतकऱ्याचा मका जळून खाक !
क्राईम

धरणगावात खळबळ : ७३ वर्षीय वृद्ध महिलेच्या घरात घुसून अज्ञात हल्लेखोराने जीवघेणा हल्ला !

June 27, 2025
खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !
क्राईम

खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !

June 27, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group